अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन वनौषधी उद्यान, उद्यान विद्या, भाजीपाला संशोधन विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत असून, शेतकºयांचा कल या पिकांकडे वाढला आहे. त्यामुळे मसाला पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये सातत्याने वाढ होत आहे. सुगंधी औषधी वनस्पती पिकाकडे शेतकºयांनी वळावे, याकरिता सुगंधी औषधी वनस्पतीच्या व्यावसायिक शेतीवर भर देण्यात येत आहे.या प्रकल्पाचा आदर्श घेत बºयाच व्यावसायिक शेती सुरू केली आहे. अंजनगाव सुर्जी येथील शेतकºयांनी तिखाडी तेल निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे. अनेक भागात या वनस्पतीची लागवड करण्यात येत आहे. या शेतीला व्यापक स्वरू प देण्यासाठी कृषी विद्यापीठाने मोहीम हाती घेतली असून, शेतकºयांनी सुगंधी वनस्पतीची व्यावसायिक लागवड करावी, यासाठीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. तिखाडी हे तेल गुणकारी असून, गुडघे, सांधेदुखीवर या तेलाचा उपयोग करण्यात येतो. नागार्जुन औषधी वनस्पती उद्यानात तिखाडी तेल निर्मिती प्रकल्प असून, माफक दरात तिखाडी तेलाचा पुरवठा गरजवंतांना उपलब्ध करण्यात येत आहे. शेतकरी,नागरिक या तेलाचा वापर करीत आहेत. शेतकरी पारंपरिक पिकांसह या शेतीकडे वळत आहेत. यावर्षी तर ओवा पिकांची लागवड केली आहे. सोप लागवडीचाही प्रयोग शेतकरी करीत आहेत. हळद पिकाचे क्षेत्र या भागात वाढत आहे.- नागार्जुन उद्यानात ५०० वनस्पतींचे जतनवनस्पती औषधी शेतीचा प्रसार मोठ्या प्रमाणात व्हावा, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन वनस्पती उद्यानात सुगंधी औषधी वनस्पतीची रोपे व बियाणे शेतकºयांसाठी ठेवण्यात आली आहेत. यात कोरफड, शतावारी, क रंज, बिहाडा, गुग्गुळ, अडुळसा, पानफुटी, निरगुडी, सुगंधी गवत, तिखाडी, खस (वाळा), ही रोपे तर कौचा, अश्वगंधा, अक्कलकारा, बिक्झा इत्यादींच्या बियाण्यांचा समावेश आहे. यापूर्वी सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डॉ. संजय वानखडे यांच्याकडे या विभागाचा पदभार होता त्यावेळी त्यांनी विविध वनस्पती येथे आणल्या आहेत. त्यावेळी त्यांनी खडसींग ही वनस्पती आणली होती. ही वनस्पती सर्पदंशावर काम करीत होती.
शेतकऱ्यांचा कल मसाले, सुगंधी वनौषधीकडे वाढला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 2:03 PM