शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
2
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
3
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
4
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
5
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
6
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
7
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
8
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
9
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
10
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
11
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
12
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
13
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
14
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
15
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
16
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
17
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
18
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
19
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
20
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

शेतकऱ्यांचा कल संरक्षित शेतीकडे; विदर्भातील शेतकऱ्यांची पॉली हाउसकडे वाटचाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 6:27 PM

अकोला : ‘संरक्षित शेती’ संकल्पनेला विदर्भातील शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आता मोठ्या संख्येने येथील शेतकरी हरितगृह तंत्रज्ञानाकडे वळला आहे.

अकोला : ‘संरक्षित शेती’ संकल्पनेला विदर्भातील शेतकºयांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, आता मोठ्या संख्येने येथील शेतकरी हरितगृह तंत्रज्ञानाकडे वळला आहे. ही योजना सुरू केली, तेव्हापासून एक एकरापर्यंत पॉली हाउस उभारण्यासाठीची तरतूद करण्यात आली आहे; पण जिल्हानिहाय उद्दिष्ट कमी असल्याने शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत.या तंत्रज्ञानामुळे तापमान, आर्द्र्रता व पाणी हे सर्व घटक कृत्रिमरीत्या नियंत्रित करू न पिकांच्या वाढीसाठी असलेले आवश्यक घटक पिकांच्या अवस्थेनुसार कमी-अधिक प्रमाणात पुरविले जातात. या नियंत्रित वातावरणात सूर्यप्रकाश, कार्बनडाय आॅक्साइड इत्यादी घटकांचा वनस्पतीच्या वाढीसाठी अधिक कार्यक्षमतेने वापर करू न मोकळ्या वातावरणापेक्षाही अधिक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. नियंत्रित वातावरणासाठी प्रामुख्याने पॉली हाउससारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आता आवश्यक झाले आहे. यासाठी शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.पॉली हाउसमुळे कमी जागेत व कमी कालावधीत जास्त उत्पन्न घेता येत असून, मजुरांना वर्षभर रोजगार उपलब्ध करू न देता येतो. विशेष म्हणजे गुंतविलेल्या रकमेतून खात्रीशीर उत्पन्न मिळते. गारपीट, अवकाळी पाऊस, वादळ वारा, दव, धुके, प्रखर तापमान या नैसर्गिक घटकांपासून पिकांचे नुकसान टाळले जाते. रोग किडींच्या प्रादुर्भावापासून पिकांचे संरक्षण करू न वेळेवर उपाययोजना करता येतात.या तंत्रज्ञानाचा वापर करू न उत्पन्नात दुप्पट ते चौपट वाढ होत असल्याने या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनातर्फे ५० टक्के अनुदान दिले जात आहे. दरम्यान, अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकºयांना हरितगृह बांधणी, लागवड व देखभाल या विषयासह हरितगृहाचे प्रकार व फायदे, अर्थशास्त्र, फुलशेती, भाजीपाला लागवड, तसेच हरितगृहातील पिकांवरील रोग व किडींचे व्यवस्थापन आदीचे तंत्रज्ञान प्रशिक्षणाद्वारे समजावून सांगितले जात असल्याने शेतकरी या तंत्रज्ञानाकडे वळत आहे; पण विदर्भात जिल्हानिहाय उद्दिष्ट कमी आहे. अकोला जिल्ह्याला केवळ १ हेक्टर २० गुंठे एवढेच उद्दिष्ट आहे. ज्या शेतकºयांना पूर्वसंमती देण्यात आली, तेथे या कामाला शेतकºयांनी सुरुवात केली आहे.

- पॉली हाउस उभारण्यासाठी एक एकराची मर्यादा अगोदरपासूनच आहे. यावर्षी राज्यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.पी. एन. पोकळे,संचालक, फलोत्पादन,कृषी आयुक्तालय, पुणे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती