प्रशांत गावंडे
जिल्हा संयोजक, शेतकरी जागर मंच
..................फोटो................................
पेरणीनंतर पावसात खंड पडल्याने म्हैसांग परिसरातील काही भागात सोयाबीन, कपाशी पिकाच्या पेरण्या उलटल्या. त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्च बुडाला असून, दुबार पेरणी करण्याचे संकट निर्माण झाले आहे. त्यानुषंगाने दुबार पेरणीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर केली पाहिजे.
हेमंत देशमुख
शेतकरी, म्हैसांग.
.....................................फोटो.....................
पेरणीनंतर पावसाने दांडी मारल्याने अनेक शेतात उगवलेले पीक करपले. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी केल्याशिवाय पर्याय उरला नाही; मात्र पेरणीसाठी केलेला खर्च बुडाल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्याची गरज आहे.
ज्ञानेश्वर सुलताने
शेतकरी तथा जि.प. गटनेता.
.....................फोटो...............................
पावसात खंड पडल्याने अकोला तालुक्यातील बारुला भागात पेरणीनंतर उगवलेली पिके करपली. त्यामुळे पेरण्या उलटलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पेरणी उलटलेल्या शेतांमधील पीक नुकसानाचे तातडीने पंचनामे करून, दुबार पेरणीसाठी शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली पाहिजे.
दिलीप मोहोड
शेतकरी तथा सरपंच, आखतवाडा.
.....................फोटो..................