येथील अरुण दत्तात्रय बोंडे यांनी महावितरण कंपनीच्या पातूर कार्यालयामध्ये वीज जोडणीसाठी ६ डिसेंबर २०१४ रोजी लेखी अर्ज दिला होता. त्यानुसार त्यांना कोटेशन मिळाले. त्यांनी कोटेशन भरून विद्युत जोडणीचा भरणा केल्याची पावती सहाय्यक अभियंता कार्यालयात दिली. त्याकरिता लागणारा टेस्ट रिपोर्टसुद्धा सादर केला. परंतु पाच वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही त्यांच्या शेतामध्ये विद्युत जोडणी महावितरण कार्यालयाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना शेतीपिकापासून त्यांना वंचित राहावे लागत असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याबाबतची तक्रार त्यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली; परंतु अद्यापही त्यांना जोडणी मिळाली नसल्याने त्यांचे शेतामध्ये बागायती पिके घेण्यास अडचण निर्माण होत आहे. अरुण बोंडे यांची आमराई पातूर येथील शेत सर्वे नंबर २३५/३ मध्ये शेती असून त्यामध्ये एक विहीर आहे. तलाठी यांच्याकडून मोका पाहणी करून विहिरीबाबत फेरफार घेण्यात आला. त्याची नोंद विहिरीच्या सातबारावर आहे. शेतीचा वहिटदार ते स्वतः असून पेरेपत्रक सुद्धा त्यांच्या नावाचे आहे. त्यामुळे विद्युत जोडणी करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
पातूर येथील शेतकरी विहिरीच्या विद्युत जोडणीपासून वंचित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 4:24 AM