--बॉक्स--
पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट
१२०० कोटी
आतापर्यंत झालेले कर्जवाटप
४३३.१० कोटी
एवढ्या शेतकऱ्यांना कर्जवाटप
४७,८६५
--बॉक्स--
३६ टक्के पीककर्ज वाटप
आतापर्यंत केवळ ३६ टक्के पीककर्ज वाटप झालेले आहे. काही बँकांचा परफॉर्मन्स नेहमीप्रमाणे संथ असाच आहे. वेळेवर धावाधाव होऊ नये, म्हणून शेतकरी पीककर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील बँकांमध्ये त्यांना विविध कारणे दाखवून परत पाठविले जात आहे.
--बॉक्स--
पीक कर्ज प्रक्रियेची गती वाढवा!
शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचण सोडविण्यासाठी बँकांनी पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू करून गती देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांकडून अवाजवी कागदपत्रांची मागणी करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
--बॉक्स--
‘त्या’ कर्जदाराला ताबडतोब कर्ज
मागीलवर्षी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्ज भरले असल्यास नूतनीकरण करून त्या शेतकऱ्यांना ताबडतोब कर्ज पुरवठा होऊ शकतो. अर्ज केल्यावर दुसऱ्या दिवशी पीककर्ज खात्यात जमा होत असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेकडून सांगण्यात आले.
--कोट--
कोरोनामुळे पीककर्ज वाटपावर परिणाम दिसून येत आहे. पीककर्ज सुरळीत वाटप होण्यासाठी बँकांच्या वेळा वाढविण्यात आल्या आहेत.
- आलोक तारेनिया, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक