अकोला: केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपयांचे अर्थसाहाय्य जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असून, त्यामध्ये बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक ग्रामस्तरीय समितीकडे सादर करण्यासाठी गावा-गावांत शेतकºयांची धावपळ सुरू आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक प्रत्येक शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष सहा हजार रुपये आर्थिक साहाय्य तीन टप्प्यांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यातील पाच एकरपर्यंत शेती असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. गाव स्तरावर संबंधित तलाठ्यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय समितीमध्ये कृषी सहायक व ग्रामसेवकांचा समावेश आहे. ग्रामस्तरीय समितीकडून तयार करण्यात आलेल्या शेतकºयांच्या याद्यांची तहसील स्तरावर तालुकास्तरीय समित्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र शेतकºयांच्या याद्या २२ ते २६ फेबु्रवारी दरम्यान राज्य आणि केंद्र शासनाच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात येणार आहेत. याद्या तयार करण्याच्या प्रक्रियेत ग्रामस्तरीय समितीकडून शेतकºयांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक घेण्यात येत आहेत. त्यानुषंगाने ग्रामस्तरीय समितीमधील तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाºयांकडे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक सादर करण्यासाठी गावा-गावांत शेतकºयांना धावपळ करावी लागत आहे.सुटीच्या दिवशी महसूल, कृषी विभागाची कार्यालये सुरू!प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकºयांच्या याद्या तयार करणे तसेच शेतकºयांचे बँक खाते, आधार व मोबाइल क्रमांक संकलनाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी शनिवार व रविवारी सुटी असूनही दोन्ही महसूल विभागांतर्गत जिल्ह्यातील तहसील कार्यालये, गावा-गावांतील तलाठी, महसूल मंडळ अधिकारी तसेच कृषी विभागांतर्गत तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि कृषी सहायकांची कार्यालये सुरू होती. गावपातळीवर तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांकडून शेतकºयांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व मोबाइल क्रमांक घेण्याचे काम सुरू होते.