अकोला: शेतकऱ्यांनीआपल्या शेतातील कोणताही शेतमाल विक्री करतांना हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतमालाची विक्री करू नये असे आवाहन सहकार ,पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी अकोला येथे केले . अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विस्तारीत बाजार जिनींग प्रेसिंग फॅक्टरी आवार येथे किमान आधारभूत दरानुसार तुर खरेदी केंद्राच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय धोत्रे, आ. रणधीर सावरकर, माजी सहकार मंत्री वसंतराव धोत्रे , अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे, बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, सहकार विभागाचे उपनिबंधक गोपाल माळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.सहकार मंत्री पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी किमंत येत असेल व आर्थिक गरज असेल तर शासनाच्या शेतमाल तारण योजनेचा लाभ घ्यावा व आपला माल काही दिवसासाठी तारण ठेवून योग्य बाजारभाव प्राप्त झाल्यावर विक्रीस काढावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्याला सहकार्य करेल असे त्यांनी सांगितले. राज्यात कालपासून नाफेड व्दारे तुर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी करून आपला माल विक्रीस आणावा असे सांगून सहकार मंत्री देशमूख पुढे म्हणाले, आवश्यकता वाटल्यास व शेतक-यांची मागणी असल्यास नवीन तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील. व्यापारांनी शेतक-यांचा माल खरेदी करतांना हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करू नये. व शेतक-यांना योग्य बाजारभाव मिळवून देऊन त्यांना सहाकार्य करावे असेही सहकार मंत्री देशमूख म्हणाले.अकोला कृषी उत्पन्न समितीच्या आवारात तुर खरेदीसाठी तीन वजनकाटे लावले आहेत. सहकार मंत्र्यांच्याहस्ते चिंचोली रूद्रायणी येथील शेतकरी रोशन विलास घोरड यांच्या तुरीचे वजन माप करण्यात आले. यावेळी रोशन घोरड यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तत्पुर्वी सहकार मंत्र्यांनी वजनकाटयाचे पुजन केले. या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी , अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.गुरू वारी पाठवले मेसेजशुक्रवारी तूर खरेदी केंद्र सुरू होणार असल्याने महाराष्टÑ स्टेट मार्केटिंग फेंडरेशनच्यावतीने गुरू वारी शेतकºयांना मोबाईलवर मेसेज पाठवले होते.खरेदीचा पहिला दिवस असल्याने केवळ ४० क्विंटल तूर विक्रीसाठी आली होती. सोमवारी यामध्ये वाढ होईल. दरम्यान,शासकीय तूर खरेदी केंद्रावर आता ३.५६ क्विंटल तूर खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी १२ टक्के ओलावा व इतर प्रतवारीचे निकष आहेतच.