दानापूर (अकोला): सततच्या नापिकीस कंटाळून दानापूर येथील शेतकरीपुत्र रमेश रावजी मेसरे (४0) यांनी शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. रमेश मेसरे यांच्या वडिलांच्या नावे पाच एकर शेतजमीन असून, त्यापैकी निम्या जमिनीची वहिती ते करीत होते. गतवर्षी नापिकी झाली होती. यावर्षीही चांगले पीक आले नाही. या सततच्या नापिकीस कंटाळून त्यांनी १६ ऑगस्टच्या मध्यरात्री संत सोनाजी महाराज मंदिरासमोरील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ही बाब परिसरातील लोकांच्या निदर्शनास आली. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
सततच्या नापिकीस कंटाळून शेतकरीपुत्राची आत्महत्या
By admin | Published: August 18, 2015 1:28 AM