अकोला, दि. १८- संवेदनेच्या पातळीवर बळीराजाच्या वेदना अनुभवण्याचा व न्याय हक्कासाठी, शेतकर्यांसाठी स्वाभिमानाने जगण्याचा हक्क मागण्यासाठी रविवार, १९ मार्च रोजी शेतकरी व शेतकरी पुत्र एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन राज्यांत ठिकठिकाणी करणार असून, याच आंदोलनाचा भाग म्हणून शेतकरीविरोधी धोरणे व कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटना युवा आघाडी अकोला जिल्हा यांच्यावतीने एक दिवसाचे सामूहिक अन्नत्याग आंदोलन स्थानिक गांधी-जवाहर बाग येथे करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकरी संघटना युवक आघाडीचे सदस्य सहभागी होणार आहेत. अन्नत्याग आंदोलन शेतकरीविरोधी कोडग्या व्यवस्थेवर ओढलेला आसूड ठरावा, यासाठी सर्वच क्षेत्रात कार्यरत शेतकरी पुत्र व शेतीप्रेमींनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी संघटना युवक आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट यांनी केले आहे. रविवारी सकाळी ११.३0 वाजता आंदोलनास सुरुवात होणार आहे.
शेतकरी पुत्रांचा आज अन्नत्याग
By admin | Published: March 19, 2017 2:44 AM