- संतोष येलकर
अकोला : आधारभूत किंमत योजनेंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी ‘आॅनलाइन’ नोंदणी केलेल्या; मात्र तूर व हरभरा खरेदी करण्यात आली नाही, अशा शेतकºयांसाठी शासनामार्फत प्रतिक्विंटल एक हजार रुपयांप्रमाणे अनुदान जाहीर करण्यात आले असले, तरी अनुदानासाठी जिल्ह्यातील शेतकºयांच्या याद्यांची पडताळणी करण्याचे काम तहसील कार्यालय स्तरावर अद्याप प्रलंबित आहे. अनुदानासाठी शेतकºयांच्या याद्या पडताळणीत अडकल्याने, तूर व हरभºयाचा प्रत्यक्ष लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी ‘एनईएमएल’ पोर्टलवर आॅनलाइन नोंदणी केलेल्या; मात्र तूर व हरभरा खरेदी करण्यात आली नाही, अशा शेतकºयांना प्रतिक्विंटल एक हजार रुपयांप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय शासनामार्फत गत १४ जून रोजी घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यात तूर व हरभरा खरेदीसाठी नोंदणी केलेल्या; मात्र तूर व हरभरा खरेदी करण्यात आली नाही, अशा जिल्ह्यातील ५० हजार ५९ शेतकºयांना शासनाच्या प्रतिक्विंटल एक हजार रुपयांप्रमाणे अनुदानाचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. शासन निर्णयानुसार अनुदानासाठी पात्र शेतकºयांच्या याद्यांची पडताळणी तहसील कार्यालय स्तरावर करावयाची आहे. त्यानुषंगाने तूर व हरभरा खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी केलेल्या; मात्र तूर व हरभºयाची खरेदी करण्यात आली नाही, अशा जिल्ह्यातील शेतकºयांच्या याद्या जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांमार्फत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांकडे गत जूनमध्येच पडताळणीसाठी पाठविण्यात आल्या. परंतु, तूर व हरभरा अनुदानासाठी शेतकºयांच्या याद्यांची पडताळणी करण्याचे काम तहसील कार्यालयांमार्फत अद्यापही पूर्ण करण्यात आले नाही. शेतकºयांच्या याद्यांच्या पडताळणीचे काम प्रलंबित असल्याने, अनुदानासाठी पात्र शेतकºयांच्या याद्या शासनाकडे केव्हा सादर करण्यात येणार आणि अनुदानाचा प्रत्यक्ष लाभ जिल्ह्यातील तूर व हरभरा उत्पादक शेतकºयांना केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तहसील कार्यालयांकडून अशी सुरू आहे याद्यांची पडताळणी!शासन निर्णयातील निकषानुसार जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांकडून तूर व हरभरा खरेदीसाठी नोंदणी केलेल्या मात्र खरेदी करण्यात आली नाही, अशा शेतकºयांच्या याद्यांची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. या पडताळणीत तूर व हरभरा खरेदीसाठी नोंदणी केलेले मात्र खरेदी करण्यात आली नाही, असे शेतकरी, संबंधित शेतकºयांचे तूर व हरभरा पिकाचे क्षेत्र, झालेले उत्पादन आणि बाजारात विकलेली तूर व हरभरा इत्यादी प्रकारची माहिती तपासण्यात येत आहे.
अनुदानाच्या प्रतीक्षेत असे आहेत शेतकरीपीक शेतकरीतूर ३१८५७हरभरा १८२०२.......................................एकूण ५००५९