निमकर्दा : येथील ६५ वर्षीय शेतक-याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. केशवराव चंद्रभान इंगळे असे मृत शेतक-याचे नाव आहे. केशवराव इंगळे यांनी शुक्रवारी सकाळी १० वाजता राहत्या घरात विष प्राशन केले. ही बाब त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना तातडीने सर्वोचार रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले; मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी उरळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास उरळ पोलीस करीत आहेत.
निमकर्दा येथील शेतक-याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 10:23 PM