अकोला : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित ‘कासोधा’ परिषदेत ठरल्याप्रमाणे सोमवारी जिल्हाभरातील शेतकरी येथील गांधी-जवाहर बागेत एकवटले. येथून कालपासून अकोल्यात तळ ठोकून बसलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात शेतकºयांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने कुच करणार आहे. गांधी-जवाहर बागेत शेतकरी जागर मंचाचे संयोजक जगदीश मुरूमकार , शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, शंकरअण्णा धोंडगे, तात्या कृपाळ, सुरेश रामगुंडे, गजानन अमदाबादकर, प्रशांत गावंडे , शिवाजी म्हैसने, मनोज तायडे, ज्ञानेश्वर सुलताने यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन तेथे जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर करणार आहे.
अकोल्यात शेतकऱ्यांचा ‘सर्जिकल स्ट्राइक’ : यशवंत सिन्हांच्या नेतृत्वाखाली एकवटले शेतकरी
By atul.jaiswal | Published: December 04, 2017 1:47 PM
अकोला : शेतकºयांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी जागर मंचाद्वारे आयोजित ‘कासोधा’ परिषदेत ठरल्याप्रमाणे सोमवारी जिल्हाभरातील शेतकरी येथील गांधी-जवाहर बागेत एकवटले.
ठळक मुद्देमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने कुच करणार शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित