अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम जमा न झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याकरिता शासनाने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना अंमलात आणली. त्यामध्ये नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले, मात्र आजपर्यंत ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात आली नाही. ती रक्कम त्वरित देण्यात यावी, अशी मागणी आगर येथील शेतकरी करीत आहेत.
::::: काेट:::
दरवर्षी आम्ही कर्ज खाते नियमित भरण्याकरिता घरातील सर्व शेतीमाल कवडीमोल भावात विकून व काही उसनवारी करून ३१ मार्चच्या पूर्वी आम्ही आमचे कर्ज खाते नियमित ठेवतो. तरी याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देऊन सर्व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान द्यावे.
- ओम साकरकार, शेतकरी, आगर