शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

 महिला शक्ती’च्या मतांवर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 1:22 PM

अकोला: लोकसभा मतदारसंघामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलाही मागे नाहीत. अकोला लोकसभा मतदारसंघामधील एकूण मतदारांपैकी ४८.0१ टक्के महिला मतदार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: लोकसभा मतदारसंघामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलाही मागे नाहीत. अकोला लोकसभा मतदारसंघामधील एकूण मतदारांपैकी ४८.0१ टक्के महिला मतदार आहेत. यंदाच्या निवडणुकीत महिला शक्तीचे पाठबळ कोणत्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणार आहे, या निवडणुकीत महिला शक्तीच्या मतांची भूमिका निर्णायक ठरणार आहे; परंतु महिला शक्ती मत कोणाच्या पारड्यात झुकते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलेला असताना उमेदवारांसाठी मतदारांमधील पुरुष, महिला आणि युवक यापैकी कोणता घटक महत्त्वाचा ठरणार, याची चर्चा सुरू आहे. उमेदवारांना संसदेत पाठविण्यासाठी जशी युवक मतदारांची आवश्यकता आहे, तशीच महिला मतदारांची भूमिकासुद्धा महत्त्वाची ठरणार आहे. गत चार लोकसभा निवडणुकांमध्ये महिला शक्तीने पुरुषांच्या खालोखाल मतदान करून महिला शक्तीही मागे नसल्याचे दाखवून दिले आहे. यंदा महिला शक्ती कोणाच्या पारड्यात अधिक मते टाकतात. त्यावर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.४८ टक्के महिला मतदार अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत. त्यांची संख्या ८ लाख ९२ हजार १५९ आहे.५५.९० टक्के हे गेल्या निवडणुकीतील महिला मतदानाचे प्रमाण आहे. २०१४ च्या लोकसभेत ४ लाख ३४ हजार ५९ महिलांनी मतदान केले.५८.५० टक्के हे मागील (२०१४) लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी आहे. एकूण ९ लाख ७८ हजार ४९१ मतदान झाले होते. त्यापैकी ५५.९0 टक्के मतदान हे महिलांचे होते. त्यामुळे महिला मतदारांचा वाटा महत्त्वाचा ठरणार आहे.महिलांचा वाटा महत्त्वाचालोकसभा निवडणुकीमध्ये एकूण मतदार १८ लाख ५७ हजार ९५१ आहे. त्यापैकी ८ लाख ९२ हजार १५९ मतदार महिला आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांची भूमिका निर्णायक राहणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019