शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांच्या भाग्याचा फैसला सोमवारी; २५ हजार ८५८ विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा

By नितिन गव्हाळे | Published: May 25, 2024 6:33 PM

इयत्ता दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून २५ हजार ८५८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

अकोला: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता दहावीचा निकाल सोमवार २७ मे रोजी जाहीर करणार आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातून २५ हजार ८५८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. इयत्ता दहावीची परीक्षा हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा समजला जातो. सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांच्या इ. दहावीचा निकाल जाहिर करण्यात येणार आहे. दहावीची बोर्ड परीक्षा १ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत घेण्यात आली होती. दहावीच्या परीक्षेला १३ हजार ५४२ मुले व १२ हजार ३१६ मुली परीक्षेला बसल्या होत्या. जिल्ह्यातील १२१ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. 

परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले होते. परीक्षेच्या काळात जिल्ह्यात कॉपी करताना केवळ ८ विद्यार्थी आढळून आले होते. बोर्डाने या विद्यार्थ्यांना निलंबित केले होते. गतवर्षी जिल्ह्याचा दहावीचा निकाल निकाल ९३.६२ टक्के लागला होता. अपेक्षेप्रमाणे मुलींचाच बोलबाला होता. मुलींच्या निकालाची टक्केवारी तब्बल ९५.८६ होती. गतवर्षी ४९१ शाळांपैकी तब्बल २५९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला होता. यंदा किती शाळांची निकाल १०० टक्के लागतो आणि किती मुले व मुलींमध्ये कोण निकालात बाजी मारते. याची उत्सुकता लागलेले आहे.

या संकेतस्थळांवर होणार ऑनलाइन जाहीरअमरावती विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर https://mahresult.nic.in, http://sscresult.mkcl.org, https://sscresult.mahahsscboard.in, https://results.digilocker.go.in २७ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाSSC Resultदहावीचा निकाल