शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार पीता-पुत्राचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 2:51 PM

कान्हेरी गवळी/बाळापूर (अकोला) : जळगाव (खांदेश) येथे परीक्षा देण्यासाठी जाण्याकरीता अकोला रेल्वेस्थानकावर मोटारसायकलद्वारे जात असताना कान्हेरी (गवळी) येथील पिता-पुत्राचा अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील व्याळा ते कान्हेरी (गवळी) दरम्यान असलेल्या अंबुजा सोयाबीन तेल कारखान्याजवळ रविवार, २० जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता ही दुर्दैवी घटना घडली.

कान्हेरी गवळी/बाळापूर (अकोला) : जळगाव (खांदेश) येथे परीक्षा देण्यासाठी जाण्याकरीता अकोला रेल्वेस्थानकावर मोटारसायकलद्वारे जात असताना कान्हेरी (गवळी) येथील पिता-पुत्राचा अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील व्याळा ते कान्हेरी (गवळी) दरम्यान असलेल्या अंबुजा सोयाबीन तेल कारखान्याजवळ रविवार, २० जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. भास्कर लक्ष्मण बोरकर (५५) व ज्ञानेश्वर बोरकर (२५) असे अपघातात ठार झालेल्या पीता-पुत्राचे नाव आहे.कान्हेरी (गवळी) येथील भास्कर बोरकर हे पारस येथील विद्युत प्रकल्पात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचा मुलगा भास्कर याची रविवारी जळगाव (खांदेश) येथे पोलीस भरतीची परीक्षा असल्याने दोघे पीता-पुत्र रेल्वे पकडण्यासाठी अकोल्याकडे आपल्या विना क्रमांकाच्या मोटारसायकलद्वारा पहाटेच रवाना झाले. दरम्यान, राष्ट्रीय महाार्गावरील अंबुजा सोयाबीन तेल कारखान्याजवळ त्यांच्या मोटारसाकयला अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, दोघांचाही घटनास्थळावरच मृत्यू झाला. यावेळी अंबुजा कारखान्याच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या निंबाळकर यांनी घटनास्थळावर धाव घेऊन बाळापूर पोलिसांना अपघाताची माहिती दिली. अपघाताच माहीत मिळताच व्याळा चौकीच सहायक पोलिस निरीक्षक देवीदास येऊल यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविले. यावेळी महामार्गावर वातुकीची कोंडी झाली होती. जिल्हा अपर पोलिस अधीक्षक नितीन देशमुख, उपविभागीय अधिकारी सोहेल शेख, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी , सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र जोशी यांनीही घटनास्थळाला भेट दिली. भास्कर बोरकर यांचे भाऊ रामदास बोरकर यांच्या तक्रारीवरून बाळापूर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांच्या नेतृत्वात बाळपूर पोलिस तपास करीत आहेत.काळानेच घेतली परीक्षाभास्कर बोरकर यांना पाच मुली व ज्ञानेश्वर हा एकलुता एक मुलगा होता. ज्ञानेश्वरला हा उच्च शिक्षण देण्यासाठी भास्कर बोरकर हे धडपड करत होते. रविवारी ज्ञानेश्वरची परीक्षा जळगाव खांदेश येथे होती. मुलाला रेल्वेत बसवून देण्यासाठी भास्कर हे त्याला घेऊन मोटारसायकलद्वारे अकोला येथे जात होते. परंतु, रस्त्यातच काळाने पीता-पुत्रावर घाला घातला. ज्ञानेश्वरचे स्वप्न अपूर्णच राहिले. भास्कर यांच्या पश्चात पाच मुली व पत्नी असा परिवार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूरNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6Accidentअपघात