१३ जानेवारी २०२० रोजी
सायंकाळच्या सुमारास मुलगी शाळेतून घरी आली व जेवण करून
अभ्यास करत असताना आरोपी पिता प्रवीण रामदास तेलगोटे घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी मुलीला जेवण करण्यासाठी वाढण्यास सांगितले. मुलीने जेवण वाढून आणल्यानंतर आरोपीने तिला जवळ बोलावले आणि तो तिच्यासोबत लैंगिक चाळे करू लागला. त्यामुळे मुलीने त्याला दूर करून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीने मुलीला पकडून मारहाण केली. लहान बहीण व काकूने आरोपीच्या तावडीतून तिची सुटका केली. आजीला सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर मुलीने अकोट पोलीस स्टेशनमध्ये पित्याविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी प्रवीण तेलगोटे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३२३, ३५४, बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम, २०१२ च्या ७ सह ८, ९सह १० प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील अजित
देशमुख यांनी एकूण सात साक्षीदार तपासले. आरोपीविरुध्द गुन्हा
सिध्द झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण
बाविस्कर यांनी आरोपीला एक वर्षाच्या कारावासाची आणि एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांचा अधिकचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. वरील प्रकरणाचा तपास एपीआय ज्योती अंबादास विल्हेकर यांनी केला. पोलीस हे. कॉ. संजय श्रीकृष्ण पोटे पो.स्टे. अकोट शहर यांनी पैरवी म्हणून न्यायालयात केसमध्ये सहकार्य केले.
आरोपीला चांगल्या वागणुकीची समज!
गुन्हेगारांच्या परिवीक्षेचा कायदा, १९५८ च्या कलम ४, उपकलम आजपासून २ (दोन फक्त) वर्षांकरिता चांगल्या वर्तणुकीचे, कुठलेही व्यसन न करण्याचे
आणि स्वत:च्या मुलींच्या, पत्नीच्या व आईच्या सापेक्षाने कोणताही गुन्हा न करण्याच्या अभिवचनासह १५ हजार रुपयांचे व्यक्तिगत बंधपत्र व तेवढ्याच रकमेचे योग्य व लायक जामीनदाराचे बंधपत्र आरोपीने सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.