:::::::::::::
देगाव-वाडेगाव रस्त्याची दुरवस्था
वाडेगाव : देगाव ते वाडेगाव या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे असून, खड्डे अपघातास निमंत्रण देत आहेत. या रस्त्यावरून वाहनचालकांना प्रवास करताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हा रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा मागणी करीत ग्रामस्थ करीत आहेत.
:::::::::::::
शेतकऱ्यांना पीकविम्याची प्रतीक्षा
आपातापा : येथील अनेक शेतकऱ्यांनी गतवर्षी सोयाबीन तूर, कपासी, या पिकांसाठी पीकविमा काढला; परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा केवळ सोयाबीन, मूग, उडीद या पिकांसाठीच विमा मंजूर केला असून, मात्र अद्यापही शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नाही.
:::::::::::::
वन्यप्राण्यांचा हैदोस;
पिकांचे नुकसान
अडगाव : यंदा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरणी आटोपत आली असून, आता रब्बी पीक बहरत असताना वन्यप्राण्यांनी हैदोस घालत या पिकांची नासाडी सुरू केल्याने ही पिके संकटात सापडल्यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.