अकोला: आदर्श कॉलनी येथील सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जिल्हा उपनिबंधक म्हणून रुजू झालेल्या डॉ. प्रवीण लोखंडे यांनी महिला अधिकारी व काही कर्मचाऱ्यांचा अतोनात छळ सुरू केला असून, याच छळापायी या कार्यालयातील कार्यालय अधीक्षिका अनिता भाकरे यांची कार्यालयात जेवण करतानाच प्रकृती चिंताजनक झाल्याचा प्रकार १६ आॅगस्ट रोजी घडला. लोखंडे यांनी प्रचंड दबाव आणल्याने भाकरे यांना लकवा आला, त्यामुळे त्यांचा हाताची बोटे व पाय वाकडे झाले होते; मात्र कर्मचाºयांनी तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आली.मलकापूर परिसरातील रहिवासी अनिता मुरलीधर भाकरे या जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था येथे कार्यालय अधीक्षक म्हणून कामकाज सांभाळतात. गत चार वर्षांपासून त्यांचे कामकाज योग्य असल्याने त्यांचा एका कार्यक्रमात गौरवही करण्यात आला; मात्र मागील एका महिन्यापूर्वी अमरावती येथून अकोल्यात रुजू झालेले जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी महिला अधिकारी व कर्मचाºयांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू केला. महिलांसोबत उद्धट बोलणे, महिला कर्मचाºयांना रविवारी दुपारी कार्यालयात बोलावणे यासह अनेक प्रताप सुरू केल्याची तक्रार संबंधित महिला अधिकारी यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे केली आहे. १६ आॅगस्ट रोजी भाकरे या कामात व्यस्त असताना लोखंडे यांनी त्यांची टिंगल टवाळी करून त्यांना धाकदपट केले तसेच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. याच दबावामुळे भाकरे यांची अचानक प्रकृती बिघडली व त्या जमिनीवर कोसळल्या. त्यामुळे कर्मचाºयांनी बाहेरील वाहन बोलावून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. लोखंडे यांचे वाहन कार्यालयात उभे असतानाही त्यांनी वाहन न दिल्याने ते कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांसोबत शत्रूसारखेच वागत असल्याचे दिसून येत आहे. लोखंडे हे केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठी स्टंटबाजी करीत असून, त्यांच्या या जाचामुळे एक महिला अधिकारी बेशुद्धावस्थेत गेली होती. त्यामुळे संबंधित जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अनिता भाकरे यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे केली आहे. या तक्रारीमुळे लोखंडे आता विनाक ारण त्रास देणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली असून, जीवाचे बरेवाईट झाल्यास संबंधित अधिकारीच जबाबदार राहणार असल्याचेही भाकरे यांनी नमूद केले आहे. दरम्यान, या संदर्भात कर्मचारी संघटनांनीही बैठक घेऊन लोखंडे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
महिला दक्षता समिती झोपेत
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयात महिला अधीक्षक अनिता भाकरे यांचा विनाकारण छळ सुरू असतानाही महिला दक्षता समितीने मात्र साधी दखलही घेतली नसल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या घटनेला तीन दिवस उलटल्यावरही महिला दक्षता समितीद्वारे साधी चौकशीही न झाल्याने दक्षता समितीच्या महिला पदाधिकाºयांचीच चौकशी करण्याची मागणी होत आहे. एका महिला अधिकाºयाचा बेसुमार छळ सुरू असताना येथील महिला अधिकारी मात्र या प्रकाराला मूक संमती दर्शवित असल्याचे दिसून येते.डॉ. लोखंडे सेवाभावही विसरलेजिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी एका महिला अधिकाºयाचा प्रचंड छळ केल्यानंतर सदर महिला जेवण करीत असतानाच त्यांना लकवा आल्यासारखे झाले. त्या जमिनीवर खाली कोसळल्यानंतर प्रवीण लोखंडे हा प्रकार सीसी कॅमेºयात पाहत होते. स्वत: बीएएमएस, एमडी डॉक्टर असलेले लोखंडे यांनी महिला अधिकाºयाची प्रकृती बिघडल्यावरही मदत केली नाही. कार्यालयातील वाहन कार्यालयाबाहेर उभे असतानाही महिला अधिकाºयाला डॉक्टरकडे नेण्यासाठी ते वाहन दिले नाही. त्यामुळे कर्मचाºयांनी तातडीने बाहेरून वाहन बोलावून त्यांना रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी झाल्यास तसेच सीसी फुटेजची तपासणी केल्यास हा छळ उघड होईल अशी चर्चा कर्मचारी वर्गात आहे.
एका शेतकºयाने अवैध सावकारी प्रकरणाची तक्रार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे केलेली आहे. सदर तक्रार भाकरे यांनी काही दिवस त्यांच्याकडेच ठेवली. त्यामुळे संबंधित शेतकºयाला न्याय देण्यास वेळ लागत होता. या संदर्भात त्यांना विचारणा केली होती. या विचारणा केल्यामुळे त्यांनी टेन्शन घेतले असावे आणि त्यांची प्रकृती बिघडली असावी असा अंदाज आहे.- डॉ. प्रवीण लोखंडेजिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला. लाचखोरी अन् अवैध सावकारीचा परवानाजिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे अमरावती येथे कार्यरत असताना त्यांना लाच घेताना पकडण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेत ते बाहेर आल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावे सावकारीचा परवानाही असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, या सर्व प्रकरणांची नव्याने सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.