- संतोष येलकरअकोला : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अखेर येवता येथील शासकीय जमिनीवरील सहा खदानींना तारेचे कुंपण घेण्यात आले असून, भूमिअभिलेख विभागाद्वारे मोजणी करून खदानींच्या सीमादेखील निश्चित करण्यात आल्या आहेत.जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांच्यासह संबंधित अधिकाºयांनी गत २९ आॅक्टोबर रोजी अकोला तालुक्यातील येवता आणि येथील शासकीय जमिनीवरील खदानींची तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान कोणत्याही खदानीची सीमा निश्चित नसल्याचे आढळून आले. त्यामुळे खदानींच्या क्षेत्राची मोजणी करून सीमा निश्चित करण्यासह खदानींना कुंपण घेण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत १ नोव्हेंबर रोजी दिला होता. त्यानुसार येवता येथील शासकीय खदानधारकांनी भूमिअभिलेख विभागामार्फत खदानींची मोजणी करीत, खदानींच्या सीमा निश्चित करण्यात आल्या, तसेच सहा खदानींच्या क्षेत्राला तारेचे कुंपण घेण्याचे काम ३ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आले.सूचना फलक लावले!जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार येवता येथील सहा खदानींच्या क्षेत्रात संबंधित खनिपट्टाधारकांकडून सूचना फलक लावण्यात आले. सूचना फलकांवर खनिपट्टाधारकाचे नाव, गाव, खदानीचे क्षेत्र, खनिपट्टा मंजुरीचा आदेश क्रमांक खनिपट्टा मुदतीचा दिनांक इत्यादी माहिती नोंदविण्यात आली आहे.उत्खननाचे मोजमाप पूर्ण!येवता येथील शासकीय सहा खदानींच्या क्षेत्रात खनिपट्टाधारकांनी केलेल्या उत्खननाचे मोजमाप करण्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला होता. त्यानुसार संबंधित खदानींच्या क्षेत्रात करण्यात आलेल्या उत्खननाचे मोजमापदेखील करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार येवता येथील शासकीय सहा खदानींच्या क्षेत्रात तारेचे कुंपण घेण्यात आले असून, मोजणी करून खदानींच्या सीमा निश्चित करण्यात आल्या. खदान क्षेत्रात सूचना फलकदेखील लावण्यात आले व उत्खनाचे मोजमाप करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.-डॉ. अतुल दोड,जिल्हा खनिकर्म अधिकारी..