अकोला : कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्यासाठी ‘कामगंध सापळे’ हा एकमेव पर्याय असल्यागत शेतकरी कामाला लागला असून, खासगी वितरकांकडून हे सापळे खरेदी केली जात आहेत; पण अनेक ठिकाणी बोंडअळीचे पतंग सापळ््यात अडकत नसल्याच्या तक्रारी शेतकरी करीत असून, ‘नर’ पतंगाला आकर्षित करण्यासाठी यात वापरले जाणारे रसायन कोणते, असाही प्रश्न पडला आहे.मागीलवर्षी कपाशीवर बोंडअळीने आक्रमण केल्याने यावर्षी सुरुवातीपासूनच बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी कृषी विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. कापूस उत्पादक पट्ट्यातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानेही विविध उपाययोजना करीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मान्सूनपूर्व पेरणी केलेल्या कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव लवकर होत असल्याने शासनाने यावर्षी २० मेपर्यंत बीटी कापसाचे बियाणे विक्रीवर कंपन्यांना बंदीही घातली होती. बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी ‘कामगंध सापळे’(फेरोमेन ट्रॅप) प्रभावी ठरत असल्याचे सांगत कपाशीच्या शेतात ’कामगंध सापळे’ लावण्यावर भर देण्यात आला, त्यामुळे या तंत्रज्ञानावर विश्वास ठेवून शेतकºयांनी कामगंध सापळे लावण्यास सुरुवात केली; पण हे सापळे अधिकृतरीत्या शेतकºयांना पूरक प्रमाणात न मिळाल्याने खासगी आस्थापनांनी बाजारपेठ काबीज केली. बाजारात सर्रास ३० ते ३५ रुपयाला एक सापळा विकण्यात येत आहे. या सापळ््यात बोंडअळीच्या ‘नर’ पतंगाला आकर्षित करण्यात येणारे रसायन वापरण्यात येते; पण अनेक शेतकºयांच्या शेतावर लावलेल्या कामगंध सापळ््यात पतंग अडकलेच नसल्याने चित्र आहे. एकतर या सापळ््यात वापरले जाणारे रसायन तपासणार कोण, असा प्रश्न पडला आहे. कृषी अधिकारी म्हणतात, हे कीटकनाशक कायद्यात येत नाही, तेव्हा शेतकºयांनी दाद मागावी कोणाकडे, असा प्रश्न पडला आहे.-कामगंध सापळे विकत घेताना संशय येत असल्यास शेतकºयांनी त्याची रीतसर पावती घेणे गरजेचे आहे.डॉ. अनिल कोल्हे,मुख्य पीक संरक्षण अधिकारी,कीटकशास्त्र विभाग,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.