अकोला : बुुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर आणि धामणगाव येथे शेतीला लागणारा १,५०० मेट्रिक टन रासायनिक खताचा साठा घेऊन रेल्वेची (रॅक) वाघीण पोहोचली आहे. आता वाशिम आणि त्यानंतर अकोेल्याला पोहोचणार आहे. कोरोना विषाणूूचा प्रसार रोखण्यासाठी देशात २३ मार्च मध्यरात्रीपासून ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच प्रकारची वाहतूूक सेवा बंद आहे. असे असले तरी जीवनावश्यक सेवेसह शेतीपयोगी बियाणे, खते, इतर साहित्य वाहतूक करण्यास अत्यावश्यक सेवा म्हणून सूूट देण्यात आली आहे. त्यामुुळेच पीक पेरणीसाठी लागणाऱ्या खतांचा साठा गंतव्य स्थळावर पोहोेचविण्याचे काम सुुरू करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते वेळेवर उपलब्ध व्हावीत याकरिता १,५०० मेट्रिक टन खताचा साठा घेऊन रेल्वेची वाघीण मलकापूर येथे पोहोेचली असून, दुसरी वाघीणदेखील एक-दोन दिवसात पोेहोचणार आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथेही खते पोहोचविण्यात येत असून, चिखलदरा, परतवाडा, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांना अडचण भासू नये हा या मागील उद्देश आहे. वाशिमला एक-दोन दिवसात खताची वाघीण पोहोचणार आहे. मलकापूर येथून संपूूर्ण बुलडाणा जिल्ह्याला रोडद्वारे खताचा पुुरवठा करावा लागणार आहे. तसेच धामणगाव येथूून यवतमाळ जिल्हा आणि अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, परतवाडा आदी भागात रोड वाहतुकीद्वारे खताचा साठा पोेहोचावा लागणार असल्याने प्रथम येथे खते पाठविण्यात आली आहेत. इफको आणि आरसीएफची ही खते आहेत. अकोला येथेही येत्या आठवड्यात खते पोहोेचणार आहेत. खताचा साठा पोहोचविण्यास सुरुवात झाली असून, मलकापूूरला रॅक पोहोचली आहे. दुसरी रॅकही मलकापूरला पोहोचणार आहे. जिथे लांब रोड वाहतूक करण्यात येत आहे. तेथे प्रथम खते पाठविण्यात येत आहेत.- सुभाष नागरे, संचालक, खते, बियाणे, अमरावती.
अकोल्यात लवकरच खते पोहोेचणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 6:13 PM