अकोला: महसूल विभागामार्फत ‘ई-पीक पाहणी’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या ॲप्समध्ये पिकांची नोंदणी करीत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने डोकेदुखी वाढली आहे.
इ-पीक पाहणी ॲप्सद्वारे सातबारावर पिकांची नोंदणी करता येणार आहे; मात्र पीक पाहणी ॲप सुरळीत चालत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. या ॲप्समध्ये नोंदणी करताना शेतकऱ्यांना नेटवर्कची समस्या, सर्व्हर डाऊन, तसेच अनेक शेतकऱ्यांना मोबाईलच हाताळता येत नसल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. ‘ई-पीक’ पाहणी ॲप्समध्ये पिकांची नोंदणी करण्यासाठी शेतकरी ज्या व्यक्तीस मोबाईल हाताळता येतो त्याच्याकडे चकरा मारीत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास त्यांना महसूल विभागाचे कर्मचारी मदत करणार आहेत.
--------------------------------
हाताळणी कोण शिकविणार?
मी गत दोन दिवसांपासून इ-पीक पाहणी ॲप्सद्वारे पिकांची नोंदणी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र होत नसल्याने पीक पाहणी राहून गेली आहे. पिकांची नोंदणी करण्यासाठी महसूल विभागाने प्रशिक्षण द्यावे.
- शेतकरी.
---------------------
पीक पाहणी ॲप्स डाऊनलोड होत नसून, प्रॉब्लेम येत आहे. तसेच ॲप्समधील फोटो अपलोड करणे कठीण आहे. याबाबत सुरुवातीला प्रशिक्षण असल्यास नोंदणी करणे सोयीचे ठरणार आहे.
- शेतकरी.
---------------------------------
कोणत्या तालुक्यात किती?
तालुका नोंदणी ॲक्टीव्ह इन ॲक्टीव्ह
पातूर १५७२५ ११७८१ ३९४४ ६०.६४ टक्के,
बार्शीटाकळी १३२०६ ९०६६ ४१४० ४३. ३९ टक्के,
मूर्तिजापूर १२५२९ ८७१० ३८१९ ४२.९४ टक्के,
अकोट १५९५१ ११४४५ ४५०६ ४२.६२ टक्के,
बाळापूर ११७४७ ८१३८ ३६०९ ३६.१७ टक्के,
तेल्हारा ७५५६ ४०९१ ३४६५ २३.१० टक्के
अकोला ८९३१ ५३५० ३५८१ २०.४५ टक्के.
एकूण ८५६४५ ५८५८१ २७०६४ ३६.९१ टक्के