अकोल्यासह अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा वेगाने फैलाव होत आहे. चाचणी झालेल्या रुग्णांमध्ये बांधितांची संख्या अमरावती व यवतमाळमध्ये ५० टक्केपेक्क्षा जास्त आहे, तर अकोल्यातही ३५ टक्क्यांवर प्रमाण आहे. ही स्थिती गंभीर असून, नागरिकांनी काळजी न घेतल्यास मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या ज्या प्रमाणात विषाणूचा संसर्ग वाढत आहे. ते बघता कोरोना विषाणूमध्ये परिवर्तन झाल्याची दाट शक्यता आहे. एका व्यक्तीपासून दुसरे व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची विषाणूची क्षमता वाढलेली आहे. एका कुटुंबामध्ये सर्वच सदस्यांना संसर्ग होत आहे. नागपूरपासून औरंगाबादपर्यंत जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी अधीक प्रमाणात काही अंशी, असे रुग्ण बघावयास मिळत आहे. म्हणजेच विषाणूमध्ये काही बदल निश्चितच होत असल्याचेही त्यांनी सांगितले. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसार होण्याची त्याची शक्ती वाढल्याचे दिसून येते. त्यापासून होणारा आजारही तेवढाच घातक असल्याने नागरिकांनी नियमीत मास्कचा वापर करून नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
बदलेल्या वातावरणाचाही परिणाम
कोरोना विषाणूची संख्या वाढण्यामागे गत काही दिवसांमध्ये वातावरणात झालेल्या बदलाचाही मोठा परिणाम दिसून येत आहे. वातावरणातील तापमाणात झालेला मोठा बदल आणि दमट हवामान यामुळे विषाणूसाठी पोषण वातावरण निर्माण होत असल्याचे कोविड राज्य कोविड टास्क फोर्सचे प्रतिनिधी डॉ. सुभाष सोळुंखे यांनी सांगितले.राज्य कोविड टास्क फोर्सचे प्रतिनिधी डॉ. सुभाष सोळुंखे यांनी व्यक्त केली.