लोकमत न्यूज नेटवर्कअकोला (साने गुरुजी साहित्य नगरी) : विदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेतर्फे आयोजित दोन दिवसीय ५ वे बालकुमार साहित्य संमेलन प्रभात किड्स स्कूल परिसर, वाशिम रोड, अकोला येथे १ व २ डिसेंबर रोजी होत आहे. संमेलनाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून, संमेलन स्थळ साने गुरुजी साहित्य नगरी बालक-पालक, नामवंत साहित्यिक, सिने कलावंतांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. डबिंग व सिने कलावंत मेघना एरंडे-जोशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शुक्रवारी, सकाळी ९ वाजता भाषा गौरव दिंडी व विविध साहित्य दालनांच्या उद्घाटनाने संमेलनाला प्रारंभ होणार आहे. लोक साहित्य या मुख्य संकल्पनेवर आधारित दिंडीमध्ये अकोला जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आणि शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी लेजीम, वासुदेव, ओवी व शेतकरी गीत, जोगवा, गोंधळ, अभंग, पोतराज तसेच कोळीगीत, भारुड, लावणी, पोवाडा आणि कीर्तन आदी प्रकार सादर करतील.
‘मला काही तरी सांगायचे’ परिसंवाद दुपारी ३.३0 वाजता शकुंतलाबाई मालोकार स्मृती सर्मपित बालक-पालकांसाठी ‘मला काही तरी सांगायचे’ या विषयावर व्याख्याते सचिन बुरघाटे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. या परिसंवादात विविध जिल्ह्यांमधील व शाळांमधील बालकुमार प्रतिनिधी सहभाग घेणार आहेत.