अकोला: विधान परिषदेच्या अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी सोमवारीदेखील एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पाचवा दिवसही कोराच ठरला. अकोला-बुलडाणा-वाशिम स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २७ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्जांंंचे वितरण व उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २ डिसेंबर पासून अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात सुरू झाली. ९ डिसेंबरपर्यंंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी सोमवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पाचवा दिवसही अर्जाविना कोरा ठरला. अर्ज वितरणाच्या पाचव्या दिवशी सोमवारी तीनही जिल्ह्यांतून एकाही इच्छुक उमेदवाराने अर्ज घेतला नाही.
उमेदवारी दाखल करण्याचा पाचवा दिवसही कोराच!
By admin | Published: December 08, 2015 2:15 AM