लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये जमा करण्याच्या पाचव्या हप्त्यात १३ जूनपर्यंत जिल्ह्यातील ६० हजार ८५४ शेतकºयांना लाभ मिळाला असून, शेतकºयांच्या बँक खात्यात १२ कोटी १७ लाख ८० हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाºया प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यात प्रतिवर्ष ६ हजार रुपयांची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. जिल्ह्यात नोंदणी करण्यात आलेल्या १ लाख ९१ हजार १२१ शेतकºयांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये पहिल्या हप्त्यात १ लाख ९१ हजार १२१ शेतकºयांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांप्रमाणे पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली असून, दुसºया हप्त्यात १ लाख ७७ हजार ४५५ शेतकºयांना, तिसºया हप्त्यात १ लाख २७ हजार ५६० शेतकºयांना, चवथ्या हप्त्यात १ लाख ६ हजार ७३३ शेतकºयांना ‘पीएम-किसान’ सन्मान निधीचा लाभ मिळाला असून, पाचव्या हप्त्यात १३ जूनपर्यंत जिल्ह्यातील ६० हजार ८५४ शेतकºयांना पीएम-किसान सन्मान निधीचा लाभ मिळाला असून, संबंधित शेतकºयांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांप्रमाणे १२ कोटी १७ लाख ८ हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने प्रत्येकी २ हजार रुपयेप्रमाणे अनुदानाची रक्कम जमा करण्यात येत आहे. त्यामध्ये पाचव्या टप्प्यात आतापर्यंत जिल्ह्यातील ६० हजार ८५४ शेतकºयांच्या खात्यात १२ कोटी १७ लाख ८ हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी