ओल्या दुष्काळामुळे व शेतमालाला असलेल्या अल्प भावामुळे शेतकरी आज आर्थिकदृष्ट्या प्रचंड आर्थिक संकटात सापडून शेतकरी आजच्या घडीला पूर्णपणे खचून गेला आहे. यावर्षी झालेल्या पावसामुळे नदी व नाल्याकाठच्या शेती पूर्णपणे खरडून गेलेल्या आहेत. तर काही शेतामध्ये पाणी साचलेले आहे. त्यामुळे मूग, सोयाबीन, तूर, उडीद या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर बँकेच्या कर्जाचे ओझे, मुलामुलींच्या शिक्षणाची जबाबदारी, मुलीच्या लग्नाची जबाबदारी अशा प्रकारची अनेक संकटे त्यांच्यासमोर उभी आहे. बँकेचे कर्ज काढून व महागडे बियाणे खरेदी करून सर्व पैसे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला लावले आहे. मात्र, यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रत्येकाची शेती उद्ध्वस्त झालेली आहे.
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी शासनाकडे अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष अरविंद कोकाटे, शरद हजबे, शहराध्यक्ष, उपाध्यक्ष हरिभाऊ वानखडे, विवेक शिंदे, सचिन शिंदे, मुन्ना नाईकनवरे, संदीप चौढाळे, विलास नसले, गणेश म्हसाये, अमोल ढोक, नगरसेवक सचिन देशमुख, राजेंद्र काळे, गणेश मोरे, सुनील ढवळे, गजानन मोरे, आशिष कोकाटे आदींनी केली आहे.
फोटो: