लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अलीकडच्या काळात ‘जिहाद’ हा चर्चेचा विषय आहे. इस्लाम समजून घेताना जिहाद समजून घेणे आवश्यक आहे. जिहाद म्हणजे अन्यायाच्या विरोधात सर्वशक्तीनिशी लढा देणे; मात्र कुराणात सांगितल्याप्रमाणे किंवा इस्लामला मान्य असलेले जिहादी वर्तन अलीकडच्या काळात होत नाही. याचे कारण म्हणजे मुळातच इस्लाम समजून घेतलेला नाही. ज्याने इस्लाम समजून घेतला, तो कधीच समाजविरोधी वर्तन करीत नाही, असे मत प्रा.शम्सुद्दीन तांबोळी (पुणे) यांनी व्यक्त केले.प्रमिलाताई ओक सभागृह येथे बुधवारपासून नवरात्र व्या ख्यानमालेला प्रारंभ झाला. बाबूजी देशमुख वाचनालयाच्याव तीने आयोजित नवरात्र व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रा.तांबोळी यांनी गुंफले. ‘मुस्लीम समाज-प्रतिमा, वास्तव, सुधारणा’ या विषयावर प्रा.तांबोळी यांनी विचार व्यक्त केले. आधुनिक दृष्टी आणि सत्यशोधक वृत्ती असलेल्या हमीद दलवाई यांच्या ‘मुस्लीम सत्यशोधक समाजाचा’ वैचारिक वारसा प्रा.तांबोळी चालवित आहेत. प्रा.तांबोळी पुढे म्हणाले, की जिहाद हा दोन प्रकारचा असतो. एक अल-ए-अकबर आणि दुसरा अल-ए-असगर. अल-ए- अकबर हा श्रेष्ठ दर्जाचा असतो. आणि अल-ए-असगर हा दुय्यम दर्जाचा. अल-ए-अकबर प्रकार अहिंसा करणे शिकवि तो. शांततेत स्वत:च्या विरोधात लढा यामध्ये दिला जातो. प्रत्येक माणसात षडरिपू असतात. ते बाजूला सारू न आत्मशुद्धी करणे म्हणजे अल-ए-अकबर जिहाद. सच्चा मुसलमान, सज्जन मुस्लमान तयार होणे किंवा करणे यामध्ये अपेक्षित असते. अल-ए-असगर यामध्ये रक्तपात, हिंसा करण्याची परवानगी दिलेली आहे. तुमच्या आणि अल्लाच्या मधात जर कोणी येत असेल, तर स्वरक्षणासाठी आणि अन्याय होत असेल, तर अन्याच्या विरोधात शस्त्र उगारण्याची परवानगी यामध्ये दिली आहे; परंतु आजच्या काही जिहादी संघटनांनी याचा पूर्णपणे अ र्थ समजून न घेतल्याने आत्मघातकी, हिंसक घटना घडवितात, ज्या इस्लाममध्ये सांगितलेल्या आचरणाविरोधात आहे.फतवा याविषयी प्रा.तांबोळी यांनी सांगितले, की फतवा हा धार्मिक आदेश नसून, तो ज्येष्ठांनी दिलेला सल्ला असतो; मात्र आजकाल फतव्याला आदेश मानून याविरोधी अनेक आंदोलने होतात. इस्लामच्या आचरणात इमामला (जाणकार) एखाद्या समस्येवर, घटनेवर मत विचारणे. यावर जाणकाराने दिलेला सल्ला हा फतवा नसतो. परिस्थिती, काळानुरू प हा फतवा मान्य किंवा अमान्य करण्याचा अधिकारी इस्लाम धर्माने प्रत्येक नागरिकाला दिला आहे. एखाद्या व्यक्तीने समस्यांचे, प्रश्नांचे उत्तर शोधताना सदसद्विवेकबुद्धीने निर्णय घेऊन वागणे, हेच मो. पैगंबरांना अपेक्षित असते.
अन्यायाच्या विरोधात लढा देणे म्हणजे ‘जिहाद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 1:50 AM
अकोला : अलीकडच्या काळात ‘जिहाद’ हा चर्चेचा विषय आहे. इस्लाम समजून घेताना जिहाद समजून घेणे आवश्यक आहे. जिहाद म्हणजे अन्यायाच्या विरोधात सर्वशक्तीनिशी लढा देणे; मात्र कुराणात सांगितल्याप्रमाणे किंवा इस्लामला मान्य असलेले जिहादी वर्तन अलीकडच्या काळात होत नाही. याचे कारण म्हणजे मुळातच इस्लाम समजून घेतलेला नाही. ज्याने इस्लाम समजून घेतला, तो कधीच समाजविरोधी वर्तन करीत नाही, असे मत प्रा.शम्सुद्दीन तांबोळी (पुणे) यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देनवरात्र व्याख्यानमाला