पातूर : अकोला तालुक्यातील डोंगरगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारास मारहाण केल्याची घटना १९ जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणातील आरोपी गावात फिरत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयाचे अध्यक्ष शंकर बोचरे यांनी पातूर तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शंकर बोचरे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, तालुक्यातील डोंगरगाव येथे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांच्या विजयोत्सवादरम्यान विरोधी गटाच्या काही व्यक्तींनी दगडफेक करीत चिमुकल्यांसह नागरिक जखमी झाले होते. या प्रकरणातील आरोपींविरोधात बोरगावमंजू पोलिसांत गुन्हे दाखल केले, तरीसुद्धा गावात फिरताना दिसून येत असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या आरोपींविरोद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार दीपक बाजड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देताना जि.प.सदस्य सुनील फाटकर, माजी पातुर पंचायत समिती सभापती बालूभाऊ बगाडे, महात्मा जोतिबा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शंकर बोचरे, श्रीराम सेना विदर्भ संयोजक मंगेश गाडगे, नगरसदस्य राजू उगले, प्रवीण इंगळे, शिर्ला ग्रा.पं. सदस्य मंगल डोंगरे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन बारोकार, दिनेश गवई, अण्णा पोहरे, सचिन बायस, ‘वंचित’चे डॉ. ओमप्रकाश धर्माळ, पं.स.सदस्य अनिल राठोड, सचिन ढोणे, माजी न.प. सदस्य गुलाब गाडगे, विजय काळपांडे, सागर कढोणे, कैलास बगाडे, गजानन बारताशे, राजू बोरकर, परशराम बंड, अजिंक्य निमकंडे, महेश बोचरे, पातूर युवा शहरप्रमुख योगेश फुलारी, किरण निमकंडे, गणेश गाडगे, सुनील बंड, पंकज शेगोकार आदी उपस्थित होते.
................(फोटो)