अकोला : अकोट फाइल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या उगवा येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. सिलिंडर देवाणघेवणीवरून हा वाद झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी अकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उगवा येथील रहिवासी पद्माबाई गोपाल खरात या महिलेच्या तक्रारीनुसार शेजारी राहणाऱ्या लता बोबडे, मंगला साळुंके व शहादेव साळुंके यांनी त्यांच्या सोबत गॅस सिलिंडरच्या देवाणघेवाणवरून वाद घातला. त्यानंतर काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी एका पुरुषांसह दोन महिलांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. तर दुसऱ्या गटाने ही तक्रार दिल्याची माहिती असून या प्रकरणाची चौकशी पोलीस करीत आहेत.