आकोट : आकोट विधानसभा मतदारसंघातून नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी गेलेले नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष अफजलखाँ आसिफखाँ यांच्यासह ५0 ते ६0 जणांविरुद्ध जिल्हाधिकार्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आकोट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रानुसार, उमेदवार अफजलखाँ आसीफखाँ हे २२ सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने नामनिर्देशनपत्र दाखल करण्याकरिता तहसील कार्यालय परिसरात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत ५0 ते ६0 जणांचा जमाव होता. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याची तक्रार पीएसआय ममताबादे यांनी आकोट पो.स्टे.ला दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी अफजलखाँ आसीफखाँ, अशोक वडी, संजय शेगोकार, शोएब मिर्झा जुबेर मिर्झा, जावेद अली अशरफ अली, जमीर खाँ आसीफखाँ, सरफराजखाँ परवेज यांच्यासह ४0 ते ५0 जणांविरुद्ध भादंवि १८८, १३५ मुंबई पोलिस अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय पाटील करीत आहेत.
उमेदवारासह कार्यकर्त्यांवर आकोटात गुन्हा दाखल
By admin | Published: September 25, 2014 2:49 AM