राजरत्न सिरसाट। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाच्या अनिश्चिततेमुळे सलग दहा वर्षांपासून सरासरी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसाच शिल्लक नाही.यावर्षी पुन्हा पावसाने या संकटात भर टाकल्याने शेतकरी हतबल झाला असून, शेतीची मशागत, बी-बियाणे खरेदीसाठी त्यांना बँका, सावकारांचे दरवाजे ठोठावे लागले.पण त्यांच्या या प्रयत्नांना यातील कोणीच दाद देत नसल्याचे चित्र आहे.यातच पावसाचा थांगपत्ताच नसल्याने पेरण्या उलटल्या आहेत. दुबार, तिबार पेरणीसाठी त्यांना धावपळ करावी लागत आहे; आता तर अर्थबळच उरले नसल्याने शेकडो शेतकऱ्यांनी शेतं पेरण्याऐवजी कोरडे ठेवले आहे.मागील वर्षी अल्पशी सुधारणा वगळता विदर्भातील कृषी विकासाचा दर गत बारा वर्षांपासून शून्य टक्क्यावरच आहे. पुन्हा नैसर्गिक आपत्ती, भूमी आणि शेतमालाच्या घसरलेल्या दरामुळे या विकास दरात घसरणच सुरू असल्याने विदर्भातील शेतकरी खचला आहे. गत पाच वर्षांत तर शेतकऱ्यांच्या परिस्थितीत तसूभरही सुधारणा झाली नसून, नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. विदर्भातील पावसाचे प्रमाण हे असमान असल्याने गेल्या दहा वर्षांतील शेतीपासून मिळणारे उत्पन्न घटले आहे. शेतकऱ्यांना नफ्याऐवजी तोटाच झाल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. यावर्षी तर बिकट परिस्थिती असून, मुग,उडिदाचे पीक संपले आहे. सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन या परिस्थितीमुळे मोठ्याप्रमाणात घटण्याची शक्यता आहे.या सर्व प्रतिकुल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसाच शिल्लक नसून, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुला-मुलींचे लग्न या सर्वांमुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. याचवेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणने आहे. पण सर्वच बाजुने परिस्थिती प्रतिकुल असल्याने यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी पावसाअभावी पेरण्या केल्या नाहीत त्यांनी शेत कोरडी ठेवली असून, पाऊस आलाच तर हरभरा पेरणीचा विचार करणार असल्याचे एकूणच ग्रामीण भागात सद्याचे चित्र आहे.दरम्यान, गत दोन, तीन दिवसांपासून पश्चिम विदर्भातील काही भागात तुरळक स्वरू पाचा पाऊस झाल्याने तिबार पेरणीपासून वाचलेल्या पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले आहे. ती पीक तग धरू न असली तरी जमिनीत ओलावाच नाही,सद्या ढगाळ वातावरण आहे. त्याचा फायदा या पिकांना होत आहे.विदर्भात तुरळक पाऊस विदर्भात पावसाचे तुरळक पुनरागमन झाले आहे.पण पडणारा पाऊस विशिष्ट भागातच होत आहे. सार्वत्रिक, दमदार पाऊस अद्याप झाला नसून, धरणांचा जलसाठादेखील शेवटच्या घटका मोजत आहे. पश्चिम विदर्भासाठी पीक, पाण्याच्या बाबतीत ही संकटाची सूचना असल्याने सर्वांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहेत.
वऱ्हाडातील शेतकऱ्यांच्या संकटात भर!
By admin | Published: July 17, 2017 3:35 AM