राजरत्न सिरसाट/अकोला : पावसाच्या अनिश्चिततेमुळे सलग दहा वर्षांपासून सरासरी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसाच शिल्लक नाही.यावर्षी पुन्हा पावसाने या संकटात भर टाकल्याने शेतकरी हतबल झाला असून, शेतीची मशागत, बी-बियाणे खरेदीसाठी त्यांना बँका, सावकारांचे दरवाजे ठोठावे लागले.पण त्यांच्या या प्रयत्नांना यातील कोणीच दाद देत नसल्याचे चित्र आहे.यातच पावसाचा थांगपत्ताच नसल्याने पेरण्या उलटल्या आहेत. दुबार, तिबार पेरणीसाठी त्यांना धावपळ करावी लागत आहे; आता तर अर्थबळच उरले नसल्याने शेकडो शेतकऱ्यांनी शेतं पेरण्याऐवजी कोरडे ठेवले आहे.
वऱ्हाडातील शेतकऱ्यांच्या संकटात भर!
By admin | Published: July 16, 2017 8:36 PM