अकोला : बीटी कपाशीमुळे जमिनीची पोत बिघडत असल्याने शेतकऱ्यांनी देशी कापूस लागवड करावी, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे काम सुरू असून, यावर्षी हे बियाणेदेखील उपलब्ध केले. आता शासनानेदेखील देशी कपाशी पेरणीवर भर दिल्याने कृषी विभाग बियाणे कंपन्यांना सांगून देशी बियाणे उपलब्ध करू न देणार आहे.दोन दशकांपूर्वी प्रवेश करणाºया बीटी कपाशीने देश व्यापला असून, ९५ टक्के क्षेत्रावर शेतकरी बीटी कपाशीची पेरणी केली जाते; परंतु बीटी कपाशीच्या पेरणीमुळे जमिनीचे आरोग्य बिघडत असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने देशी कपाशी लागवडीवर भर दिली असून, ०८१, रजत, ८८२८, ९९१६ अशा अनेक कपाशीच्या जातींसह यावर्षी सुवर्ण शुभ्र ही कपाशीची जात दिली आहे. तथापि, बीटीच्या पेरणीमुळे या सर्व जातींची मागणी कमी आहे. कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर देशी कपाशी घेतली जाते तसेच देशी सरळ वाण शेतकऱ्यांना विक्री केल्या जात आहे. शेतकरी मेळावे, शिवारफेरी व अॅग्रोटेक कृषी प्रदर्शनातून या कपाशी पेरणीसाठी शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. यावर्षी केंद्र शासनाने दखल घेत बीटी पेरा कमी करू न देशी कपाशी पेरणीवर भर देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी राज्यातील शेतकºयांना देशी कपाशीचे बियाणेदेखील उपलब्ध करू न दिले जाणार आहे. राज्याच्या कृषी विभागाही खासगी बियाणे निर्मिती कंपन्यांना सांगून देशी कपाशीचे बियाणे उपलब्ध करणार आहे.
देशी कपाशी पेरणीवर कृषी विद्यापीठाचा भर असून, केंद्र शासनानेदेखील आता देशी कपाशी पेरणीसंदर्भात शिफारस केली आहे. त्यानुषंगाने देशी कपाशी बियाणे निर्मितीसाठी यावर्षी बीजोत्पादनावर भर देणार आहोत.- डॉ. व्ही. के. खर्चे,संचालक संशोधन,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.