मागील वर्षी काेराेनाच्या कालावधीत तीन नगरसेवकांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या सदस्य पदांसाठी पाेट निवडणूक हाेऊ घातली आहे. प्रभाग क्रमांक ३ मधील वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविका ॲड. धनश्री देव, प्रभाग ४ मधील भाजपचे नगरसेवक संताेष शेगाेकार तसेच प्रभाग ८ मधील भाजपच्या नगरसेविका नंदा पाटील यांचे आकस्मिक निधन झाले हाेते. त्यांच्या निधनामुळे तीन नगरसेवक पद रिक्त झाले असून रिक्त पदांसाठी राज्य निवडणूक आयाेगाने पाेट निवडणूक घेत निवडणुकीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला. नियाेजित वेळापत्रकानुसार मनपाच्या निवडणूक विभागाने बुधवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली.
विधानसभेची मतदार यादी ग्राह्य
महापालिकेच्या पाेट निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२१ पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार यादीच्या आधारे प्रभागनिहाय मतदारांचे विभाजन करण्यात आले आहे.
८ मार्च राेजी मतदान केंद्रांची यादी मनपाच्या निवडणूक विभागाने मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर येत्या ८ मार्च राेजी प्रभागातील मतदान केंद्रांची यादी जाहीर केली जाणार आहे. मतदान केंद्रनिहाय मतदारांची विभागणी केली जाणार असून ही अंतिम यादी १२ मार्चपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
असे आहेत प्रभाग निहाय मतदार
प्रभाग क्रमांक पुरूष महिला इतर एकूण
३ ११२८० १११०६ ०३ २२३८९
४ १२९०० १२३१३ ०१ २५२१४
८ ९७३५ ८८३३ ०० १८५६८