शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

अखेर ४७ लाख जमा केले; शहर बस सेवा सुरू!

By admin | Published: February 25, 2017 2:19 AM

अकोलेकरांनी सोडला सुटकेचा नि:श्‍वास

अकोला, दि. २४- जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अकोलेकरांच्या सेवेत पाच शहर बसेस दाखल झाल्यानंतर 'आरटीओ'कडून परमिट देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. यापूर्वीच्या बसेसची थकबाकी जमा करा त्यानंतरच बस सेवेला परवानगी देण्याची भूमिका आरटीओने घेतली होती. महापालिकेने थकबाकीचे ४७ लाख रुपये जमा करताच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने सिटी बसच्या परवानगीचे सोपस्कार पूर्ण केल्यानंतर दोन दिवसांपासून सिटी बस सेवा सुरू झाली. यामुळे अकोलेकरांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे.बस वाहतूक सेवेची गरज ओळखून मनपा आयुक्त अजय लहाने यांनी प्रशासनाच्या सोयीचा करारनामा तयार करून निविदा अर्ज बोलावले. यामध्ये श्रीकृपा ट्रॅव्हल्स नागपूरच्या वतीने सर्वाधिक २ रुपये ११ पैसे प्रति किलोमीटर दराची निविदा प्रशासनाने मंजूर केली. संबंधित कंपनीकडून मनपाला वार्षिक ४६ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होईल. जानेवारी महिन्यात बस सेवा सुरू करण्याचा दावा संबंधित कंपनीने केला होता. जानेवारीत शहरात दाखल झालेल्या पाच सिटी बसेसला उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाने परमिट मंजूर करण्यास आखडता हात घेतला होता. आरटीओच्या नियमानुसार यापूर्वी बंद पडलेल्या सिटी बसेसची थकीत रक्कम मनपा प्रशासनाने जमा न केल्यामुळे नवीन बसेसला परमिट मिळण्यास विलंब झाला होता. ही रक्कम (४७ लाख) आठवडाभरापूर्वी मनपाने जमा केल्यानंतर शहर बस सेवेला परवानगी मिळाली. मागील दोन दिवसांपासून सिटी बस धावत आहेत.