शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

अखेर जिल्ह्याला पीक विम्याचे १३४ कोटी मंजूर

By admin | Published: June 24, 2016 1:33 AM

विभागासाठी ६८६ कोटी मंजूर ; दुष्काळग्रस्त शेतक-यां मिळणार दिलासा.

अकोला: अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांला शासनाने पीक विम्याच्या नुकसानभरपाईपोटी ६८६ कोटी रू पये मंजूर केले असून, जिल्ह्यात खरीप हंगाम सन २०१५-१६ मधील विविध पिकांसाठी अकोला जिल्ह्याला १३४ कोटी २८ लाख ५९ हजार रुपये नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. नुकसानभरपाईची रक्कम शासनाकडून बँकेमार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.आकोट तालुक्यामध्ये कापूस, ज्वारी, सोयाबीन, उडीद, मूग. तेल्हारा तालुक्यामध्ये सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी व तीळ. बाळापूर तालुक्यामध्ये कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी व तीळ. पातूर तालुक्यामध्ये सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग व तीळ. अकोला तालुक्यामध्ये ज्वारी, कापूस, तूर, सोयाबीन, उडीद, मूग व तीळ. बार्शीटाकळी तालुक्यामध्ये तूर, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग व तीळ, तर मूर्तिजापूर तालुक्यामध्ये सोयाबीन व मूग या पिकांना शासनाकडून नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. सदर नुकसानभरपाईची रक्कम शासनाकडून बँकेमार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. पीक विम्यापोटी आकोट २४ कोटी २९ लाख २६ हजार ८१०, तेल्हारा १४ कोटी ८६ लाख ३३ हजार ५०७, बाळापूर तालुका १७ कोटी १४ लाख ७७ हजार ४०३, पातूर तालुका १७ कोटी ९० लाख ६५ हजार ५४०, अकोला तालुका ३४ कोटी ५३ लाख ८० हजार ९९९, बार्शीटाकळी तालुका ८ कोटी ८५ लाख ६५ हजार ४३१, तर मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ६ कोटी ६८ लाख ९ हजार ८४२ रुपये विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. तालुकानिहाय मंजूर पीक विमा रक्कम एकूण १३४ कोटी २८ लाख ५९ हजार ५३२ रुपये आहे. ही रक्कम लवकरच प्राप्त होणार असून, संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पीक विमा रकमेचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रतीक्षा केली जात होती. दरम्यान, शासनामार्फत पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आल्याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे.