अकोला : गतवर्षीच्या खरीप हंगामात अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी पात्र लाभार्थी शेतकºयांच्या याद्या आणि पीक विम्याची रक्कम बँकांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया संबंधित विमा कंपनीमार्फत गुरुवारपासून सुरू करण्यात आली. त्यामुळे पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात लवकरच पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे.पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात विविध जिल्ह्यांत शेतकºयांनी पीक विमा काढला. कपाशी, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी इत्यादी खरीप पिकांचा विमा काढण्यात आला. पीक विमा योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकºयांसाठी संबंधित विमा कंपनीकडून पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली; मात्र पीक विम्यासाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या याद्या विमा कंपीमार्फत संबंधित बँकांमध्ये सादर करण्यात आल्या नसल्याने, १९ जूनपर्यंत अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यात आली नाही. खरीप पेरण्या तोंडावर आल्या असल्या तरी, पीक विमा रकमेचा लाभ मिळाला नसल्याने, पीक विम्याची रक्कम खात्यात केव्हा जमा होणार, याबाबत शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात असताना अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील पीक विमा काढलेल्या शेतकºयांपैकी पीक विमा रक्कम मंजूर झालेल्या पात्र लाभार्थी शेतकºयांच्या याद्या आणि पीक विम्याची रक्कम संबंधित बँकांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया संबंधित विमा कंपनीमार्फत अखेर २० जूनपासून सुरू करण्यात आली. त्यामुळे पात्र लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यात लवकरच पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे.गतवर्षी पीक विमा काढलेल्या शेतकºयांपैकी पीक विम्यासाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील काही शेतकºयांच्या याद्या आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीकडून झाल्या आहेत. त्यानुसार पात्र लाभार्थी शेतकºयांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.- अनंत वैद्य,मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.