अकाेला बाळापूर व अकाेला तालुक्यातील खारपाणपट्ट्यासाठी ६९ प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेला वान प्रकल्पातून पाणी देण्याच्या प्रस्तावाला अखेर जलसंपदा विभागने मंजुरी दिली आहे. ‘ वान’मधून बाळापूर व अकाेल्याला पाणी देण्यास तेल्हारा तालुक्यातील नागरिकांसह अकाेट मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी विराेध केला हाेता; मात्र या विराेधाला न जुमानता बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी पाणी पुरवठा याेजनेसाठी आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर करून आणला आहे. बाळापूर व अकाेला तालुक्यातील खारपाणपट्ट्यात असलेली व दरवर्षी टंचाईचा सामना करावा लागत असलेल्या बाळापुरातील ५३ गावे व अकोला तालुक्यातील १६ गावे असे एकूण ६९ गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आ. देशमुख यांच्या पुढाकाराने प्रस्तावित करण्यात आली आहे. या याेजनेसाठी सन २०३९ ची लाेकसंख्या गृहीत धरून ३ ५५ दलघमी पाणी आरक्षणाला ९ डिसेंबरच्या पत्रानुसार जलसंपदा विभागाचे अवर सचिव वै. रा. कुरणे यांनी आरक्षणाला मंजुरी दिली आहे. या याेजनेमुळे कवठा, लाेहारा, डाेंगरगाव, कळवा, वसेगाव, कळवी, स्वरूपखेड, जनाेरी मेळ, माेखा, दगडखेड, नागद, सागद, कारंजा (रम), अंत्री, नंंबी, हिंगणा, बहादुरा, उरळ आदी ६९ गावांचा समावेश आहे. या गावांना फायदा हाेणार आहे.
१५ टक्क्यांपेक्षा जास्त झाली आरक्षण मर्यादा
६९ प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेच्या प्रस्तावानंतर जसंपदा विभागाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडे माहिती मागितली. महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी सादर केलेल्या माहितीनुसार वानमध्ये सध्या बिगर सिंचन आरक्षण ६६.४८६ दलघमी असून, हे प्रकल्पिय पाणी वापराच्या तुलनेने ७८.७४३ टक्के आहे. आता वानचा प्रस्ताव मंजूर झाल्याने
पाणी वाटप आरक्षण क्षेत्रीय वाटपाच्या १५ टक्के मर्यादेपेक्षा जास्त झाले आहे, त्यामुळे याला शासनस्तरावर मान्यता घेणे आवश्यक हाेते. ती मान्यता आता मिळाली आहे.
असे राहील आरक्षण
१)तेल्हारा शहर पाणी पुरवठा याेजना:-३.१६ दलघमी
२) अकाेट शहर पाणी पुरवठा याेजना:-८.६६ दलघमी
३)जळगाव जामाेद पाणी पुरवठा याेजना:-४.०२ दलघमी
४)८४ खेठी पाणी पुरवठा याेजना:- ४.२३९ दलघमी
५)शेगाव शहर पाणी पुरवठा याेजना:-५.६२ दलघमी
६)जळगाव ता. १४० खेडी पाणी पुरवठा याेजना:-८.४५४ दलघमी
७)तेल्हारा-अकाेट तालुका १५९ प्रादेशिक पाणी पुरवठा याेजना:-३.७५३ दलघमी
८) अकाेला शहर अमृत पाणी पुरवठा याेजना:-२४.०० दलघमी
९) ‘६९ याेजने’
नेला ३.५५ दलघमी
नामदारापेक्षा आमदार वरचढ, भारसाकळेंना आव्हान
बाळापूर तालुक्यातील या याेजनेसाठी पाणी आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर करू नये, असे पत्र जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री पद सांभाळणारे अकाेल्याचे पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी त्यांच्याच विभागाला दिले हाेते. तेल्हारा तालुक्यातील जनतेचा विराेध व भविष्यातील राजकारणाची पेरणी करून बच्चू कडू यांनी अशा प्रकारे भूमिका घेतली हाेती, त्यामुळे आ. नितीन देशमुखांच्या संकल्पनेतील ही याेजना अडचणीत येईल, अशी चर्चा हाेती; मात्र आ. देशमुख यांनी राजकीय वजन दाखवत पाणी आरक्षणाला मंजुरी मिळवून आणली आहे, तर दुसरीकडे याच वान प्रकल्पातून अकाेला शहरासाठी मंजूर २४ दलघमी पाणी आरक्षणाला अकाेटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी शासनाकडे भांडून स्थगिती आणली हाेती. त्यांचाही या याेजनेला विराेध हाेता, त्यामुळे पाणी आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर हाेणे हे त्यांच्यासाठी शिवसेनेने दिलेले आव्हानच ठरले आहे .
काेट
बाळापूर व अकाेला तालुक्यातील खारपाणपट्ट्यातील गावांसाठी गाेड पाणी देणारी ही याेजना आहे. या याेजनेमुळे काही राजकीय नेत्यांनी तेथील जनतेची दिशाभुल केली असल्याने त्यांचा विराेध आहे. मी शिवसेना जिल्हाप्रमुख असल्याने तेल्हारा तालुक्यातील नागरिकांच्याही भावनांची ठेवून आहे. लवकरच तालुक्यातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन मी चर्चा करेन, तसेच या तालुक्यातील सिंचनासाठी पाइपलाइनद्वारे पाणी पुरवठा याेजनेचाही पाठपुरावा करेन.
नितीन देशमुख, आमदार.