लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू असलेल्या ‘लॉकडाऊन’च्या पृष्ठभूमीवर अखेर शिधापत्रिका नसलेल्या गरीब व्यक्तींसह मजुरांना प्रत्येकी ५ किलो तांदूळ व १ किलो हरभऱ्याचे वाटप जिल्हा पुरवठा विभागामार्फत मंगळवारपासून सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील शिधापत्रिका नसलेल्या ५५ हजार ११० मजूर लाभार्थींना मोफत तांदूळ व हरभºयाचा लाभ मिळणार आहे.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेल्या ‘लॉकडाऊन’च्या पृष्ठभूमीवर केंद्र शासनाच्या ‘आत्मनिर्भर भारत सहायता पॅकेज’ अंतर्गत शिधापत्रिका नसलेल्या गरीब व्यक्तींसह मजुरांना मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिमहा व प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ आणि आणि १ किलो हरभरा वितरित करण्याचा निर्णय १९ मे रोजी राज्य शासनाच्या पुरवठा विभागामार्फत घेण्यात आला; परंतु जिल्ह्यातील शिधापत्रिका नसलेल्या व्यक्ती व मजुरांच्या याद्या तयार नसल्याने, जिल्ह्यातील शिधापित्रका नसलेल्या मजुरांना ७ जूनपर्यंत मोफत तांदूळ व हरभरा वाटप सुरू करण्यात आले नाही. त्यानुषंगाने ‘शिधापत्रिका नसलेल्या मजुरांना मिळाला नाही मोफत तांदूळ-हरभरा’ अशा आशयाचे वृत्त ८ जून रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित करण्यात आले. या वृत्ताची दखल घेत, जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यातील शिधापत्रिका नसलेल्या गरीब व्यक्तींसह मजुरांना प्रत्येकी ५ किलो तांदूळ व १ किलो हरभºयाचे वाटप १० जूनपासून रास्तभाव दुकानांमधून सुरू करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील शिधापत्रिका नसलेल्या ५५ हजार ११० गरीब-मजूर लाभार्थींना मोफत तांदूळ व हरभºयाचा लाभ मिळणार आहे.दोन महिन्यांचे एकत्र वितरण!मे व जून या दोन महिन्यातील मोफत तांदूळ व हरभºयाचे वितरण जून महिन्यात एकत्र सुरू करण्यात आले. त्यामध्ये प्रतिमहा, प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ व १ किलो हरभरा याप्रमाणे दोन महिन्यातील एकत्र मोफत तांदूळ व हरभºयाचे वितरण सुरू करण्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू. काळे यांनी दिली.केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर सहायता पॅकेज अंतर्गत जिल्ह्यातील शिधापत्रिका नसलेल्या गरीब व मजुरांना मे व जून या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिमहा, प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ व १ किलो हरभºयाचे वितरण १० जूनपासून सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शिधापत्रिका नसलेल्या ५५ हजार ११० मजूर लाभार्थींना मोफत तांदूळ व हरभरा वितरणाचा लाभ देण्यात येणार आहे.- बी.यू. काळेजिल्हा पुरवठा अधिकारी
अखेर शिधापत्रिका नसलेल्या मजुरांना मोफत धान्य वाटप सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 10:41 AM