खिरपुरी : बाळापूर तालुक्यातील खिरपुरी बु. येथे संततधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुराचे पाणी गावात शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. मात्र यासंदर्भात सर्व्हे न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात धडक दिली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत तहसीलदारांनी आदेश देऊन महसूल विभाग व ग्रामपंचायत प्रशासन विभागाने दि. १३ सप्टेंबर रोजी गावात सर्व्हे केला. गावात पुराचे पाणी शिरल्याने अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र गावात सर्व्हे न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात धडक देऊन मदतीची मागणी केली. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत ग्रामसेवक, तलाठ्याने घरोघरी जाऊन पाहणी केली. त्यानुसार प्रत्येकाचा अहवाल तयार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र दांदळे, विजय शिरसाट, राधाकृष्ण दांदळे, प्रदीप पातोडे, ज्ञानेश्वर कवडकार, अमोल कावडकार, अरुण चिंचोलकर, विष्णू सोळंके, संतोष शिरसाठ, राजू शिरसाट, ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश मसने, महादेव पदमने, शीतल पातोडे, जानराव शिरसाट, उल्हास शिरसाट, संतोष मेहेरे, दिगंबर तूबोकार, मारुती तायडे इत्यादी गावकरी उपस्थित होते. नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी होत आहे. (फोटो )
अखेर खिरपूरी येथे सर्वेक्षण सूरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 4:23 AM