अकोला: जिल्ह्यातील १३६० शाळांपैकी १२१४ शाळांनी आरटीईची ऑनलाइन नोंदणी पूर्ण केली. अकोला जिल्ह्याने शाळा नोंदणीचे उद्दिष्ट १०० पूर्ण केल्यानंतरही पालकांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. अखेर आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तारीख ठरली असून, १६ ते ३० एप्रिल या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
वंचित व दुर्बल घटकांतील मुला-मुलींसाठी शिक्षण हक्क कायदा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अधिनियम २००९ अन्वये कलम १२ (एफ) (सी) नुसार व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुला-मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद शासनाने केली आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील आरटीई पात्र शाळांना नोंदणी बंधनकारक होती. त्यानुसार आरटीई पात्र शाळांनी नोंदणी केली आहे. प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी आरटीई ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्याबाबतचे पत्र सोमवारीच जारी केले असून, त्यानुसार १६ एप्रिलपासून आरटीईअंतर्गत जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या १२१४ शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी पालकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे........................................
आरटीई नाेंदणीकृत अशा आहेत, शाळा
अकोला मनपा- ३६अकोला पं. स. - २९९
अकोट- १९७बाळापूर- १३८
बार्शीटाकळी- १४६मूर्तिजापूर- १६४
पातूर- ११४तेल्हारा- १२०
...................................................जिल्ह्यात १३ हजार ७३२ जागा आहेत. या जागांसाठी आरईटीच्या ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला १६ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. पालकांनी ऑनलाइन अर्ज करावेत.-रतनसिंग पवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक