कान्हेरी गवळी : बाळापूर तालुक्यातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यामुळे रोडची चाळणी झाली आहे. कान्हेरी गवळी ते वाडेगाव रस्त्याची सुद्धा दुरवस्था झाली असून, मोठ्या प्रमाणात रस्त्याची चाळणी झाली होती. याबाबत लोकमतने १५ डिसेंबर रोजी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत, बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीसह डांबरीकरणाच्या कामास प्रारंभ केला आहे.
रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे रोजच लहान-मोठे अपघातसुद्धा घडत होते. या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी कोणत्याच राजकीय नेत्यांनी, अधिकाऱ्यांनी तालुक्यात रस्त्याचे काम करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर बांधकाम विभागाने रस्ता डांबरीकरणाच्या कामास सुरुवात केली आहे.
कान्हेरी गवळी ते वाडेगाव रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाला नुकताच प्रारंभ झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
फोटो: