अकोला: लोकचळवळ बनलेल्या मोर्णा स्वच्छता मिशनसाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांचा मुलगा शौर्य याच्या वाढदिवसानिमीत्त सागर कुटुंबीयांनी १० हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडे सोमवारी सुपूर्द केला. यावेळी मनपा आयुक्त जितेंद्र वाघ व मान्यवर उपस्थित होते. मोर्णा काठी घाट निर्मिती, बगीचा, शोषखड्डे या कामांसाठी या निधीचा विनीयोग केला जाणार आहे.जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचे वैभव असणाऱ्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला १३ जानेवारीपासून प्रारंभ झाला. लोकसहभागातून ही नदी मोठ्या प्रमाणात स्वच्छ करण्यास यश मिळाले आहे. मोर्णाच्या स्वच्छतेबरोबरच जिल्हा प्रशासनाने मोर्णाचा विकास करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या कामासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी आपले योगदान देण्याचा निश्चय केला. लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक यांनी मोर्णाच्या विकासासाठी निधी दिल्याने नदीकाठी विविध विकास कामांना गती आली आहे. नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पातही मोर्णाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यानंतर विविध संस्था, संघटना व अधिकाºयांना मोर्णा स्वच्छतेसाठी वैयक्तीक स्तरावर आर्थिक मदत दिली असून सोमवारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांचा मुलगा शौर्य याच्या वाढदिवसाचे औचीत्य साधुन सागर कुटुंबीयांना १० हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी पांण्डेय यांच्याकडे सुपुर्द केला.
मोर्णा स्वच्छता मिशनसाठी एएसपींकडून आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 4:58 PM
अकोला: लोकचळवळ बनलेल्या मोर्णा स्वच्छता मिशनसाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांचा मुलगा शौर्य याच्या वाढदिवसानिमीत्त सागर कुटुंबीयांनी १० हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्याकडे सोमवारी सुपूर्द केला.
ठळक मुद्देलोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक यांनी मोर्णाच्या विकासासाठी निधी दिल्याने नदीकाठी विविध विकास कामांना गती आली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांचा मुलगा शौर्य याच्या वाढदिवसाचे औचीत्य साधुन सागर कुटुंबीयांना १० हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी पांण्डेय यांच्याकडे सुपुर्द केला.