आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ३४ शिक्षकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दीड वर्षांपूर्वी पुन्हा मूळ जि. प.मध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला हाेता. दरम्यान उर्दू शिक्षकांना जिल्हयात रूजू करून न घेतल्याने हा प्रश्न प्रलंबित हाेता. त्यामुळे यावर मंत्रालयात ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार, शिक्षणाधिकारी डाॅ. वैशाली ठग, एम. ए. गफ्फार, सय्यद जव्वाद हुसेन, नईम फराज यांच्यासह उर्दू शिक्षक उपस्थित हाेते. या शिक्षकांवर समायाेजनात झालेला अन्यायही दूर करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी मंत्र्यांनी दिल्याची माहिती आहे. उर्दू शिक्षकांवरील अन्याय दूर व्हावा, यासाठी उर्दू शिक्षक संघटनेने जि. प. प्रशासन ते शासनापर्यंत पाठपुरावा केला. यावर प्रशासनाला याेग्य त्या कार्यवाहीचा आदेशही देण्यात आला. मात्र, अंमलबजावणी झाली नाही. अखेर आता न्याय मिळाला आहे.
‘त्या ’ १२ उर्दू शिक्षकांचा रूजू हाेण्याचा मार्ग माेकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:56 AM