अकाेला : वाहतूक नियम ताेडल्यानंतर २०१९ पूर्वी वाहनचालकाला जागेवरच दंड भरावा लागत हाेता़. मात्र २०१९ पासून इ चालान ही पद्धती वाहतूक शाखेत कार्यान्वित करण्यात आली असून वाहन चालकाला दंड झाल्यानंतर ताे कुठेही आणि केव्हाही दंड भरू शकताे. तसेच दंडाची रक्कम न भरता ताे हा दंड वर्षानुवर्ष थकीतही ठेवत असल्याचे आता समाेर आले असून, अकाेला वाहतूक शाखेने केलेल्या कारवायानंतर तब्बल ५० लाख रुपयांचा दंड अजूनही थकीत असल्याची माहिती समाेर आली आहे़. अकाेला वाहतूक शाखेने २०२१ या सहा महिन्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक कारवाया केलेल्या आहेत़. तब्बल ६० हजार ३१८ कारवाया करून वाहतूक शाखेने तब्बल ४१ लाख रुपयांचा दंड वसूल केलेला आहे़. तर सुमारे ५० लाख रुपयांचा दंड ३० हजारांपेक्षा अधिक वाहन चालकांकडे थकीत असून ताे वसूल करण्यासाठी आता वाहतूक शाखेने वाहन चालकांच्या घरी लेखी नाेटीस पाठविलेल्या आहेत़.
सर्वाधिक दंड माेबाइलचा वापर करणाऱ्यांना
अति वेगात वाहने चालविणे धाेकादायक आहे़ असे वाहनचालक स्वत:सह दुसऱ्यांचाही जीव धाेक्यात घालतात़ सर्वात जास्त कारवाया या अति वेगात वाहन चालविताना माेबाइलचा वापर करणाऱ्यांवर झालेल्या आहेत़. तब्बल दाेन हजार ५५१ वाहनचालकांवर कारवाया करण्यात आलेल्या आहेत़.
दंड थकीत ठेवला तर कारवाई निश्चित
दंड आकारल्यानंतर अनेकजण ताे दंड भरत नसल्याचे वास्तव आहे़ मात्र दंड थकीत ठेवला तर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून त्या वाहनाचे नूतनीकरण हाेत नाही़. वाहन चालकाचा परवाना देण्यात येत नाही़ तसेच ते वाहन दुसऱ्या काेणत्या शहरात पकडल्या गेले तर आधीचा दंड वसूल झाल्याशिवाय नवीन दंड आकारण्यात येत नाही व पर्यायाने ते वाहन जमा करण्यात येते़. त्यामुळे थकीत दंडाची रक्कम १५ दिवसांच्या आतमध्ये भरणे आवश्यक आहे़.