शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

हरभरा घोटाळ्यासाठी विक्रेत्यांचे महाबीजकडे बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 1:21 AM

गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात अनुदानित दराचा हजारो  िक्वंटल हरभरा बियाणे थेट खुल्या बाजारात विक्री होण्यास महाबीज  जबाबदार असल्याचा अंगुलीनिर्देश जिल्हय़ातील सर्वच कृषी केंद्र  संचालकांनी खुलाशामध्ये केल्याची माहिती आहे. २४ सप्टेंबर ते ६  ऑक्टोबरपर्यंत बियाणे विक्रीबाबत माहितीच नसल्याने हा प्रकार  घडल्याचे केंद्र संचालकांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेचे कृषी  विकास अधिकारी कोणती कारवाई करणार, हे पाहणे रंजक ठरणार  आहे.

ठळक मुद्देमाहितीच न दिल्याने बियाण्याची खुल्या बाजारात विक्री केल्याचा  पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात अनुदानित दराचा हजारो  िक्वंटल हरभरा बियाणे थेट खुल्या बाजारात विक्री होण्यास महाबीज  जबाबदार असल्याचा अंगुलीनिर्देश जिल्हय़ातील सर्वच कृषी केंद्र  संचालकांनी खुलाशामध्ये केल्याची माहिती आहे. २४ सप्टेंबर ते ६  ऑक्टोबरपर्यंत बियाणे विक्रीबाबत माहितीच नसल्याने हा प्रकार  घडल्याचे केंद्र संचालकांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेचे कृषी  विकास अधिकारी कोणती कारवाई करणार, हे पाहणे रंजक ठरणार  आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गेल्या वर्षी कडधान्य बियाणे  अनुदानावर देण्यात आले. त्यामध्ये रब्बी हंगामात हरभरा बियाणे  पुरवठा करण्यासाठी महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, कृभको या  उत्पादकांना राज्याच्या कृषी विभागाने आदेश दिले. त्यानुसार  सर्वाधिक बियाणे पुरवठा करणार्‍या महाबीजने २0 सप्टेंबरपूर्वी वि तरकांना हरभरा बियाणे वाटप केले. या बियाण्यासाठी शासनाकडून  अनुदान मिळणार आहे, अशा सूचना त्यावेळी दिल्याच नसल्याचे वि तरक आणि कृषी केंद्र संचालकांचे म्हणणे आहे. नेमक्या याच त्रुटीचा  फायदा घेण्याचा प्रयत्न गेल्या वर्षभरापासून वितरक, केंद्र  संचालकांकडून सुरू आहे. एकीकडे एक कोटी रुपयांपर्यंतच्या  बियाण्याचा काळाबाजार केल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी वितरक या  गोंधळाची जबाबदारी महाबीजच्या गळ्यात टाकत आहेत, तर  महाबीजनेही त्या सर्वांनाच पाठीशी घालण्याची भूमिका अगदी  सुरुवातीपासूनच घेतल्याचे आतापर्यंतच्या कारवाईवरून दिसून येत  आहे. त्यामुळे शासनाच्या अनुदानाचा लाभ प्रत्यक्ष शेतकर्‍यांना मिळू  न देता मधल्या दलालांनीच लाटल्याचे हे उत्तम उदाहरण लगतच्या  काळात पुढे आले आहे. विभागीय कृषी सहसंचालकांच्या आदेशावरून जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी कार्यालयाच्या पथकाने केलेल्या चौकशीत मोठा  घोटाळा उघड झाला. त्यामध्ये जिल्हय़ातील २११ कृषी केंद्र  संचालकांनी हरभरा बियाण्याचा केलेला अपहार उघड झाला. त्यापैकी १४६ कृषी केंद्र संचालकांना जिल्हा परिषदेचे कृषी विकास  अधिकारी एच.जी. ममदे यांनी नोटीस बजावल्या. त्यापैकी अनेकांनी  स्वत:च, तर काहींनी एकाच वकिलामार्फत स्पष्टीकरण सादर  केल्याची माहिती आहे. त्यामध्ये २३ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २0१६ या  काळात महाबीजने वितरकांना त्यांच्याकडून कृषी सेवा केंद्रांना  मिळालेले बियाणे अनुदानित दरावर असल्याची माहितीच नव्हती,  त्यामुळे ते ठरलेल्या दराने विक्री करण्यात आले. ती किंमत खुल्या  बाजारातील भावाप्रमाणे होती. त्यातून शेतकर्‍यांना अनुदानाचा कोण ताही फायदा झालेला नाही. दरम्यान, काहींनी बाजारात वाढलेल्या  प्रचंड दराचा लाभ घेण्यासाठी बियाणे टंचाई भासवून खुल्या बाजारात  विक्रीही केली. काहींनी दलालामार्फत उखळ पाढरे करून घेतले.  आता कारवाईच्या वेळी जबाबदारी झटकून शासनाची, जनतेची  बनवाबनवी करण्याचा प्रयत्न सर्वच स्तरावर सुरू आहे. त्याचे  उदाहरण वितरक, कृषी केंद्र संचालकांच्या स्पष्टीकरणातून दिसून येत  आहे. -