नव्या रुग्णालयांचे फायर ऑडिट नाही
अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, २०१९ पर्यंत शहरातील १६० रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले आहे, मात्र त्यानंतर नव्याने सुरू झालेल्या रुग्णालयांचे फायर ऑडिट झाले नाही. काही रुग्णालयांच्या फायर ऑडिटचे काम सुरू असल्याचेही सांगण्यात आले. फायर ऑडिट झालेल्या रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित दिसत असली, तरी आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणेने योग्य पद्धतीने कार्य करणे अपेक्षित आहे. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गल्लीबोळातील रुग्णालये धोक्याच्या स्थितीत
शहरातील अनेक रुग्णालो मुख्य बाजारपेठ तसेच गल्लीबोळात सुरू आहेत. त्यामुळे यातील बहुतांश रुग्णालये अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. काही रुग्णालयांचे आपत्कालीन मार्गही बंद आहेत, अशा रुग्णालयात आग लागल्यास तिथे अग्निशमन विभागाची गाडी जाणेही कठीण आहे. चार वर्षांपूर्वी गाधी रोड स्थित एका व्यापारी संकुलातील रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडली होती. त्यावेळी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली होती. धोक्याच्या स्थितीत असणाऱ्या रुग्णालयात आगीची घटना घडल्यास त्याचे परिणाम भंडाऱ्यातील घटनेपेक्षाही भयावह होऊ शकतात.
शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित असणे आवश्यक आहे. केवळ देखावा म्हणून अग्निशमन सिलिंडर लावणे योग्य नाही. मोठ्या रुग्णालयांमध्ये पुरेशी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे. हा मुद्दा प्रशासनाकडे प्रकर्षाने मांडू.
- पराग गवई, सदस्य, रुग्ण कल्याण समिती, जिल्हा स्त्री रुग्णालय