अकोला : स्थानिक बिर्ला रोडस्थित सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये अकोला महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकाने शाळा विद्यार्थ्यांना बचावाचे धडे दिले. विद्यार्थ्यांनी अशा वेळी काय करावे, याचे प्रशिक्षण येथे देण्यात आले.अग्निशामक दलाचे प्रमुख रमेश ठाकरे येथे प्रमुख अतिथी म्हणून आणि अध्यक्षस्थानी प्रदीपसिंह राजपूत उपस्थित होते. यावेळी शाळेच्या प्राचार्य मनीषा राजपूत, डॉ. पराग टापरे, डॉ. गिरिधर पनपालिया, डॉ. नयना तेलकर यांनी आवर्जुन हजेरी लावली. या कार्यशाळेचे आयोजन डॉ. अतुल महाशब्दे यांनी केले होते. ठाकरे यांनी येथे आपत्कालीन स्थितीमध्ये घ्यावयाची काळजी आणि उपाय, यावर सविस्तर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविले. आपत्कालीन परिस्थितीत लोकांना कसे वाचवावे किंवा बाहेर कसे जायचे, याबद्दल मार्गदर्शन केले. अग्निशामक सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण गरज असल्याचे याप्रसंगी डॉ. अतुल महाशब्दे बोललेत. ही कार्यशाला सन्मित्र पब्लिक स्कूलच्या प्रांगणात घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका स्वाती मालपाणी यांनी केले.